कॅनडातल्या भारतीयांनो खबरदारी घ्या…भारताकडून आवाहन

भारत कॅनडा वादाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

कॅनडातल्या भारतीयांनो खबरदारी घ्या…भारताकडून आवाहन

खलिस्तानवादी दहशतवाद्याच्या हत्येवरुन भारत आणि कॅनडा या दोन देशांमधील संबंध जबरदस्त ताणले गेले आहेत. दरम्यान, या वादाच्या पार्श्वभूमीवर कॅनडातील खलिस्तानवाद्यांनी कॅनडामध्ये स्थायिक असलेल्या भारतीयांना देश सोडण्याची धमकी दिली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून भारत सरकारने पावलं उचलायला सुरुवात केली असून कॅनडातील भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी नियमावली जाहीर केली आहे.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक अ‍ॅडव्हायझरी म्हणजेच नियमावली जाहीर केली आहे. यामध्ये कॅनडातील भारतीय नागरिकांनी काय करावं याचे निर्देश देण्यात आले आहेत. कॅनडातील वाढत्या भारतविरोधी कारवाया आणि राजकीयदृष्ट्या माफ केलेले द्वेषपूर्ण गुन्हे आणि गुन्हेगारी हिंसाचार लक्षात घेता, तिथल्या सर्व भारतीय नागरिकांना आणि तिथे अंतर्गत प्रवास करु इच्छिणाऱ्यांना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.

भारतविरोधी अजेंड्याला विरोध करणाऱ्या समुदायाकडून विशेषतः भारतीय उच्चाधिकारी आणि भारतीय विभागांना लक्ष्य केलं गेलं आहे. त्यामुळं भारतीय नागरिकांना कॅनडातील अशा घटना जिथे घडल्या आहेत त्या प्रदेशात आणि संभाव्य ठिकाणी प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

हे ही वाचा:

नागपूर विमानतळावर ८७ लाखांच्या सोन्यासह दोघांना अटक !

मोदी सरकारच्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसचा पाठींबा

कॅनडा सरकारचा आगाऊपणा

नव्या संसदेत महिला आरक्षण विधेयक सादर..

कॅनडामधील भारतीय समुदायाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी भारतातील उच्चायुक्त आणि वाणिज्य दूतावास कॅनडाच्या अधिकाऱ्यांशी सतत संपर्कात राहतील, असे सांगण्यात आले आहे. कॅनडामधील भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांनी ओटावा येथील भारतीय उच्चायुक्तालयात किंवा टोरंटो आणि व्हँकुव्हर येथील भारतीय महावाणिज्य दूतावासात नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीमुळे उच्चायुक्तालय आणि महावाणिज्य दूतावास कोणत्याही आपत्कालीन किंवा अप्रिय घटनेच्या वेळी कॅनडामधील भारतीय नागरिकांशी अधिक चांगल्या प्रकारे संपर्क साधू शकतील, असे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version