‘लाटा असे पापड’ ते ‘कासा ला बाहेर पडता!’ काय आहे हे वाचा…

‘लाटा असे पापड’ ते ‘कासा ला बाहेर पडता!’ काय आहे हे वाचा…

मनी हाइस्ट या लोकप्रिय वेबसीरिजचा पाचवा भाग आल्यानंतर तमाम चाहत्यांच्या त्यावर उड्या पडल्या आहेत. २०१७ला सुरू झालेल्या या वेबमालिकेचा पाचवा भाग ३ सप्टेंबरला प्रसिद्ध झाला आणि लगोलग सगळ्यांनी हे भाग पाहिलेही. हा भाग पाहिल्यानंतर त्यावर मिम्स बनवणाऱ्यांची प्रतिभाही यानिमित्ताने जागृत झाली आहे.

मुंबई पोलिसांप्रमाणे मनी हाइस्टच्या प्रेमात सर्वसामान्य चाहतेही मोठ्या प्रमाणात आकंठ बुडाले आहेत. ही वेबसीरिज मुळात स्पॅनिश भाषेतील आहे. त्याचे स्पॅनिश भाषेतील नाव ‘ला कासा द पापेल’ (द हाऊस ऑफ पेपर) असे आहे. आता या नावावरून अनेक मजेदार मिम्स बनविण्यात येऊ लागले आहेत. त्यामुळे एकूणच या नावाचीही चर्चा सोशल मीडियात दिसून येते. मुंबई पोलिसांनी या पाचव्या भागातील बेला चाओ या गाण्याची धून बँडवर वाजवली आहे. तो व्हीडिओही भरपूर व्हायरल झाला आहे.

ला कासा द पापेल या नावाची गंमत अनेकांनी केली आहे. यातील एका मिममध्ये म्हटले आहे की, आईने मला लॉकडाऊनमध्ये सांगितले की, लाटा असे ते पापड. मुंबई पोलिसांनीही यानिमित्ताने याच स्पॅनिश नावाचा आधार घेत लोकांना संदेश दिला आहे. तो असा- कासा ला पडता बाहेर… तर एक मासळी बाजाराचा फोटो टाकून त्यात ला कसा दिला पापलेट अस म्हणत प्रतिभेचा नवा आविष्कार दाखविला आहे. आणखी एका चित्रात कासा ला काम लावता असे लिहित शक्कल लढविली आहे.

हे ही वाचा:

‘मनी हाइस्ट’ला मुंबई पोलिसांची म्युझिकल सलामी

भारतीय संघाच्या चिंता वाढल्या! रवी शास्त्री कोरोना पॉझिटिव

जावेद अख्तर यांच्या विरोधात भाजपाचे आंदोलन

सावधान! गैर मुस्लिम मुलींना हिजाबच्या जाळ्यात ओढण्यासाठी सुरु आहेत कुरापती

पोलिसांनी वाजविलेली ही धून ऐकून अनेकांनी त्यांची तारीफ केली आहे तर काहींनी मजेत म्हटले आहे की, मनी हाइस्टमध्ये ‘चोरांनी’ गायलेले गाणे पोलिसांनी वाजवले आहे.

Exit mobile version