तामिळनाडूमध्ये झालेल्या हेलीकॉप्टर अपघातात भारताचे पहिले सीडीएस जनरल बिपीन रावत यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर जगभरातून शोक व्यक्त करण्यात आला. बिपीन रावत यांना शेवटची मानवंदना देण्यासाठी भारताच्या शेजारील देशांचे म्हणजेच श्रीलंका, भूतान, नेपाळ आणि बांगलादेशचे लष्करी कमांडर राजधानी दिल्लीत उपस्थित होते.
Delhi: Defence Attaches of different nations pay tribute to #CDSGeneralBipinRawat pic.twitter.com/fUWs5kvgWA
— ANI (@ANI) December 10, 2021
चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आणि श्रीलंका आर्मीचे कमांडर जनरल शवेंद्र सिल्वा, रॉयल भूतान आर्मीचे डेप्युटी चीफ ऑपरेशन्स ऑफिसर ब्रिगेडियर दोरजी रिंचन, नेपाळ आर्मीचे उप- प्रमुख लेफ्टनंट जनरल बाळकृष्ण कार्की, बांगलादेशच्या सशस्त्र दल विभागाचे प्रमुख कर्मचारी अधिकारी लेफ्टनंट जनरल वकर-उझ-जमान यांनी बिपीन रावत यांना मानवंदना दिली.
हे ही वाचा:
रुपेरी पडद्यावर पुन्हा चालणार राजामौलीची जादू! ‘आर आर आर’ च्या ट्रेलरचा धुमाकूळ
मुंबईत आता दिसणार लाल-पांढरे झेब्रा क्रॉसिंग
‘संजय राऊत यांच्या जिभेचे संशोधन करायला हवे’
महापौरांना धमकीचे पत्र; असे धमकीचे पत्र मिळणे ही गंभीर बाब भातखळकरांची प्रतिक्रिया
तामिळनाडूमधील कुन्नूरजवळ झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात सीडीएस बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नीसह १३ जणांचा मृत्यू झाला. काल तामिळनाडू येथून १३ जणांचे पार्थिव दिल्लीमधील पालमपूर येथे आणण्यात आले. कुटुंबियांनी श्रद्धांजली वाहिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनीही आदरांजली अर्पण केली. त्यानंतर तिन्ही दलाच्या प्रमुखांनीही श्रद्धांजली अर्पण केली.
काहीच वेळात दिल्लीच्या कॅन्टॉन्मेंटमधील ब्रार स्क्वायर स्मशानभूमीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले. बिपीन रावत यांच्या समवेत त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्या पार्थिवावरही अंत्यसंस्कार करण्यात आले. रावत यांच्या ज्येष्ठ मुलीच्या हातून त्यांना मुखाग्नी दिला गेला आहे.