26 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरदेश दुनियामायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड आणि जग थांबलं...

मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड आणि जग थांबलं…

जगभरातील विमान, रेल्वे, बँक सेवांना फटका

Google News Follow

Related

मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड झाल्याने जगभरातील अनेक व्यवहार ठप्प झाले आहेत. जगभरातील करोडो वापरकर्त्यांना या तांत्रिक बिघाडाचा फटका बसला आहे. मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनच्या क्लाउड सेवेतील तांत्रिक समस्येमुळे, शुक्रवार, १९ जुलै रोजी भारतासह जगभरातील अनेक देशांमधील महत्त्वाच्या सेवा ठप्प झाल्या आहेत.

याचा सर्वाधिक फटका बसला आहे तो विमान सेवांना तसेच बँक, रेल्वे आदी सेवांनाही याचा फटका बसला आहे. जगभरातील अनेक विमान उड्डाणे मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली असून काही उड्डाणे रद्द करावी लागली आहेत. मायक्रोसॉफ्टच्या Azure क्लाउड आणि मायक्रोसॉफ्ट 365 सेवांमध्ये समस्या निर्माण झाल्या आहेत. मायक्रोसॉफ्टने म्हटले आहे की, “आम्हाला या समस्येची जाणीव आहे आणि आम्ही याचे निराकरण करण्यासाठी अनेक टीम्सला सामील केले आहे.”

दरम्यान, आकासा एअरलाइन्सने सांगितले की, त्यांच्या काही ऑनलाइन सेवा मुंबई आणि दिल्ली विमानतळांवर तात्पुरत्या स्वरूपात अनुपलब्ध असतील. बुकिंग आणि चेक-इन सेवांसह आमच्या काही ऑनलाइन सेवा तात्पुरत्या अनुपलब्ध असतील. स्पाईसजेटनेही तांत्रिक समस्यांचा हवाला देत दिलगिरी व्यक्त केली आहे.

मायक्रोसॉफ्टच्या तांत्रिक समस्येमुळे स्काय न्यूज चॅनलने ब्रिटनमध्ये प्रसारण बंद केले आहे. आज सकाळपासून वाहिनीचे थेट प्रक्षेपण होऊ शकले नाही, असे कंपनीच्या कार्यकारी अध्यक्षांनी सांगितले आहे. शिवाय ब्रिटनमधील शेअर मार्केटवर याचा परिणाम झाला असून जगभरातील बँक सेवा ठप्प झाल्या आहेत. ऑस्ट्रेलियन टेलिकॉम कंपनी टेलस्ट्रा ग्रुपने म्हटले आहे की, ते देखील या व्यत्ययाचा सामना करत आहे. कंपनीने म्हटले आहे की, आमच्या काही प्रणाली मायक्रोसॉफ्टच्या तांत्रिक समस्येमुळे प्रभावित झाल्या आहेत.

हे ही वाचा:

निवडणूक आयोगाने ‘पिपाणी’ चिन्ह गोठवले !

खलिस्तानी दहशतवादी लखबीर सिंग संधू लांडाच्या प्रमुख साथीदाराला एनआयएकडून अटक

विशाळ गडावरील अतिक्रमणविरोधी कारवाईला स्थगिती !

नोकऱ्यामधील आरक्षणावरून बांगलादेशात हिंसाचार

एक्स या समाजमाध्यावर पोस्ट शेअर करत अनेक यूजर्सने याबाबत तक्रार केली आहे. काम करत असताना अचानक त्यांचे लॅपटॉप बंद पडत असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. तसेच तुमचा संगणक अडचणीत असून रिस्टार्ट करणे आवश्यक आहे, असे संदेश स्क्रीनवर येत असल्याचेही या यूजर्सने सांगितले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा