एकदाच नोंदणी करुन अर्ज करता येणार. म्हाडाच्या घरांसाठी एकच नोंदणी सेवा गुरुवारपासून सुरू होत आहे. त्यामुळे कोणत्याही सोडतीसाठी अर्ज करणं सहज शक्य होणार आहे.
म्हाडाच्या घरांसाठी अर्ज दाखल करणं आता आणखी सोपं होणार आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळासाठी एकच कायमस्वरूपी नोंदणी सुरू करण्यात आली आहे. त्याचा नोंदणी क्रमांक मिळाल्यानंतर म्हाडाच्या कोणत्याही मंडळासाठी आपल्याला अर्ज दाखल करता येणार आहे.
गुरुवारी ५ जानेवारीपासून नोंदणी प्रक्रिया सुरु होणार आहे. नोंदणी करणाऱ्या इच्छुकांना पॅनकार्ड, आधारकार्डसह उत्पन्नाचा दाखला आणि निवासी दाखला यामध्ये सादर करावा लागणार आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळासाठी यापुढं कायमस्वरूपी नोंदणी प्रक्रिया अंमलात आणली जाणार असून, अर्जदारांना आता एकदाच अर्ज केल्यास म्हाडाच्या कोणत्याही मंडळाच्या सोडतीसाठी अर्ज करता येणार आहे. सदरील नोंदणी प्रक्रिया गुरुवार, 5 जानेवारीपासून सुरु होणार आहे.
तात्काळ मिळणार घराचा ताबा
म्हाडा सोडतीच्या प्रक्रियेत बदल करून नवी संगणकीय प्रणाली तयार करण्यात आली आहे. आता सोडतीची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली असून अर्ज भरतानाच आवश्यक ती कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. या सोडतीआधीच कागदपत्रांची छाननी करून पात्रता निश्चिती करण्यात येणार आहे. पात्र अर्जदारच या सोडतीत सहभागी होऊ शकतील, त्यामुळे म्हाडा सोडतीत विजयी होणाऱ्या अर्जदाराला सोडतीनंतर तात्काळ घराचा ताबा देण्यात येईल असे सांगण्यात येते.
हे ही वाचा:
निर्दयी कोण शिंदे की उद्धव ठाकरे?
स्थायी समितीचे माजी अध्यक्ष राडा का करतायत?
ब्राझिलचे महान फुटबॉलपटू, तीनवेळा विश्वविजेते ठरलेले पेले कालवश
स्थायी समिती अध्यक्षांचा वचपा?
ऑनलाईन करता येणार नोंदणी
म्हाडाचं घर मिळवण्यासाठी लाखो लोक अर्ज प्रक्रियेत सहभागी होतात. एकाच वेळी शेकडो अर्ज जमा झाल्यामुळे अनेक वेळा म्हाडाचा सर्व्हर डाऊन होतो. नोंदणी करताना अर्जदारांच्या अडचणी वाढतात. गेल्या सोडत प्रक्रियेदरम्यान म्हाडाच्या एका घरासाठी १० हून अधिक अर्ज आले होते. महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात म्हाडा घरांची लॉटरी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी पुढाकार घेत असून लॉटरी प्रक्रियेत बदल करण्यासोबतच म्हाडा प्रशासन आता लोकांची सोय लक्षात घेऊन मोबाईल एप तयार करत आहे.
एपच्या माध्यमातून लोकांना संगणक,किंवा मोबाईलवर घरी बसून या प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार,अर्जदारांना लॉटरीत सहभागी होण्यासाठी मोबाईल एपद्वारे नोंदणी करण्याची सुविधा मिळणार आहे. सध्या अर्जदार ऑनलाईन पद्धतीनं कागदपत्रं सादर करतात. यापूर्वी अर्जदारांना लॉटरी प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी म्हाडाच्या वेबसाईटचा एकच पर्याय उपलब्ध होता. पण आता मोबाईल एपद्वारेही नोंदणी करणं शक्य होणार आहे.