मुंबईकरांची प्रतिक्षा संपली

मुंबईकरांची प्रतिक्षा संपली

दहिसर- डी एन नगर (मेट्रो २अ) मार्गिकेच्या मेट्रोची पहिली गाडी मुंबईत अखेरीस पोहोचला आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या डब्याचे अनावरण करणार आहेत.

हे डबे संपूर्ण भारतीय बनावटीचे आहेत. या डब्यांची निर्मीती भारत अर्थ मुव्हर्स लिमिटेड तर्फे करण्यात आली आहे. मुंबई करिता या डब्यांचा प्रवास बंगळूरूहून दिनांक २४ जानेवारी रोजी सुरू झाला तो आज संपला आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, दहिसर- डी एन नगर मेट्रो मार्गिका (मेट्रो २) आणि दहिसर पूर्व- अंधेरी पूर्व (मेट्रो ७) मार्गिकेच्या चाचण्यांना मार्च महिन्यापासून सुरूवात होईल. त्यानंतर विविध चाचण्या पार पडल्यानंतर मे महिन्यापासून सेवेला सुरूवात होईल. मुंबईमध्ये एक ११.५ किमी लांबीची मेट्रो मार्गिका आहे. ही मार्गिका मुंबईच्या अंधेरी, घाटकोपर आणि वर्सोवा या उपनगरांना जोडणारी आहे. या मार्गिकेवर अंधेरी आणि घाटकोपर ही अनुक्रमे पश्चिम रेल्वेवरची आणि मध्य रेल्वेवरची महत्त्वाची स्थानके आहेत.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मुंबई महानगर प्रदेशासाठी मोठ्या प्रमाणात मेट्रो मार्गिकांचे नियोजन केले आहे. या एकूण मेट्रो मार्गांची लांबी ३३७ किमी असणार आहे. हा संपूर्ण प्रकल्प २०२६ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.

Exit mobile version