पुढील वर्षाच्या सुरवातीला मीरा भाईदरला जोडणारी मेट्रो -९ चा पहिला टप्पा सुरु होणार आहे. तसेच याच मार्गिकेला उत्तन पर्यंत जोडण्याची योजना सुद्धा आखली आहे. या मार्गिकेमुळे मुंबईला मीरा -भाईंदरला जोडले तर जाणारच आहे पण, मुंबईचे प्रवेशद्वार असलेले दहिसर नाक्यावरील वाहतूक कोंडी १०.५८ किलोमीटरच्या मार्गिकेमुळे दूर होणार आहे. याच मार्गावरील मेदेतीया नगर या तीन मजली मेट्रो स्थानकाचे काम हे ६३.६३% टक्के पूर्ण झाले आहे. हीच मार्गिका पुढे आणखी एक ते दीड किलोमीटर मार्गाने बांधून उत्तनला जोडण्याची योजना आहे. या प्रकल्पाचे एकूण दोन टप्पे असून दहिसर पूर्व ते काशिगाव आणि सुभाषचंद्र बोस स्टेडियम पर्यंत असेल. शिवाय आणखी एक कारशेड बांधण्याची योजना सुद्धा आहे. काशिगावपर्यंत जाणारा पहिला टप्पा जरी सुरु केला तर प्रवाशांना मेट्रो सात मार्गिकच्या दहिसर स्थानकाशी जोडले जाता येईल. पहिला टप्पा या मार्गिकेला जोडण्यासाठी एमएमआरडीएला तीन ते चार गाड्यांची अजून गरज आहे.
हे ही वाचा:
मुश्रिफांवर अखेर कोल्हापुरात गुन्हा दाखल
आझाद यांना ‘गुलाम’ म्हणणाऱ्या जयराम रमेश यांच्यावर २ कोटींचा दावा
‘जमाई’ करायला गेला कमाई आणि आला पोलिसांच्या जाळ्यात
कोविडनंतर बेरोजगारीचे प्रमाण घसरणीला.. आले इतक्या टक्क्यांवर
२०२५ सालापर्यंत संपूर्ण कॉरिडॉर सुरु होणार आहे. या मार्गिकेचा फायदा मीरा रोड आणि मीरा रोड येथील प्रवाशांना होणार आहे. आत्ता मेट्रो सात आणि मेट्रो दोन मुळे थेट अंधेरी पूर्व आणि पश्चिम पर्यंत कनेक्टिव्हिटी असल्यामुळे दहिसर चेक नाक्याची वाहतूक कोंडी कमी व्हायला मदतच होईल. मेट्रो नऊ चे मेदेतीया नगर हे स्थानक तीन मजल्याचे असून यात पहिल्या मजल्यावर वाहनांसाठी उड्डाणपूल असेल, तर दुसऱ्या मजल्यावर काँकोर्से असेल तर तिसऱ्या मजल्यावर स्थानक असणार आहे. या स्थानकाची एकूण उंची हि रस्त्याच्या पातळीपासून ३५ मीटर आहे. याचेच एकूण काम ६३.६३% झालेले आहे.
मीरा भाईंदर या शहराला मुंबई मेट्रो-नऊला दहा पूर्णांक शून्य आठ (१०.०८)किलोमीटरची मार्गिका आहे. यात आठ उन्नत स्थानकांचा समावेश आहे. मेट्रो- सातचा मेट्रो- नऊ हा उत्तरेकडील विस्तार असेल तर , हि मार्गिका थोडी वेगळी असणार आहे. याचे कारण म्हणजे यात प्रामुख्याने दोन आंतरिक बदल करण्यात आले आहेत. यातले पहिले स्थानक दहिसर असून इथूनच मेट्रो सात आणि मेट्रो दोन बदलता येणार आहे तर, दुसरे स्थानक मीरा गाव हे असून इथून मेट्रो- दहाच्या स्थानकांसोबत आंतरिक बदल असणार आहेत.