चुकीच्या दाव्यानंतर ‘मेटा’कुटीला येत मागितली भारताची माफी

मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी केले होते वक्तव्य

चुकीच्या दाव्यानंतर ‘मेटा’कुटीला येत मागितली भारताची माफी

फेसबुकचे संस्थापक आणि मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी काही दिवसांपूर्वी एका पॉडकास्टमध्ये म्हटले होते की, २०२४ हे वर्ष जगासाठी अशांततेचे होते. कोविडनंतर झालेल्या निवडणुकीत भारतासह अनेक देशांमधील सरकारे पडली. या विधानामुळे खळबळ उडाली होती. यानंतर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी या चुकीच्या विधानासाठी संसद आणि भारतीय लोकांची माफी मागावी अशी मागणी केली होती. तसेच माफी न मागितल्यास कारवाईचा इशाराही दिला होता. दरम्यान, कंपनीचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांच्या वक्तव्याबद्दल मेटा कंपनीने बुधवारी भारताची माफी मागितली आहे.

अनावधानाने केलेल्या चुकीबद्दल मेटा कंपनीने भारताची माफी मागितली आहे. मेटा इंडियाचे सार्वजनिक धोरण संचालक शिवनाथ ठाकुराल यांनी एक्सवरील एका पोस्टमध्ये सीईओंच्या ‘अनावधानाने झालेल्या चुकीबद्दल’ माफी मागितली. ते म्हणाले “२०२४ च्या निवडणुकीत अनेक सत्ताधारी पक्ष पुन्हा निवडून आले नाहीत हे मार्क यांचे निरीक्षण अनेक देशांसाठी खरे आहे, पण ते भारतासाठी लागू नाही. या अनवधानाने झालेल्या चुकीबद्दल आम्ही माफी मागू इच्छितो. भारत मेटासाठी एक महत्त्वाचा देश आहे.”

जो रोगन पॉडकास्टच्या एका भागात मार्क झुकरबर्ग यांनी म्हटले होते की, “कोविड- १९ महामारीमुळे जगातील अनेक सरकारांवरील लोकांचा विश्वास उडाला आहे. त्यामुळे निवडणुकींमध्ये या सत्ताधाऱ्यांना सत्ता गमावावी लागली. यामध्ये भारताचाही समावेश आहे.” झुकेरबर्ग यांच्या या विधानानंतर मोठा वाद निर्माण झाला होता.

हे ही वाचा..

पंतप्रधान मोदींनी राष्ट्रार्पण केलेल्या INS सुरत, INS नीलगिरी आणि INS वाघशीरमध्ये काय आहे विशेष?

युद्धनौका, पाणबुडी निंर्मिती हा भारताच्या बळकटीकरणाचा पुरावा

मुंबई बस अपघात : न्यायालयाने चालकाचा जामीन अर्ज फेटाळला

जसप्रीत बुमराह ठरला आयसीसीचा ‘प्लेअर ऑफ द मंथ डिसेंबर २०२४’

दरम्यान, या प्रकरणी केंद्रीय मंत्री अश्विनी वौष्णव यांनी झुकरबर्ग यांच्या दाव्याचे खंडन करत एक्सवर पोस्ट करत त्यांना फटकारले होते. अश्विनी वैष्णव म्हणाले होते की, झुकरबर्ग त्यांची कंपनी फेसबुकद्वारे चुकीची माहिती पसरवत आहेत. ही अशी चुकीची माहिती पाहून निराशा होते. आपण तथ्ये आणि विश्वासार्हता जपली पाहिजे.

Exit mobile version