24 C
Mumbai
Friday, December 20, 2024
घरदेश दुनियामेस्सीच्या ‘त्या’ टिश्यू पेपरची किंमत ऐकून भोवळ येईल!

मेस्सीच्या ‘त्या’ टिश्यू पेपरची किंमत ऐकून भोवळ येईल!

Google News Follow

Related

डिजिटलच्या आजच्या जमान्यात कोण काय विकायला ठेवेल आणि त्याला किती किंमत मिळेल हे सांगता येत नाही. अर्जेंटिनाचा नामवंत खेळाडू लिओनल मेस्सीने बार्सिलोना क्लबमधून बाहेर पडत असल्याचे जाहीर केल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्याला दुःख आवरले नाही. त्याने समोर असलेल्या टिश्यू पेपरने आपले डोळे पुसले. एरवी हा टिश्यू पेपर कचऱ्यातच गेला असता पण तो टिश्यू पेपर आता विक्रीला ठेवण्यात आल्याचे वृत्त आहे आणि त्यासाठी तब्बल १० लाख डॉलर (सुमारे ७ कोटी रु.) इतकी रक्कम लावण्यात आली असल्याचेही बोलले जात आहे.

मेस्सीने आपला क्लब बदलून आता पॅरिस सेंट जर्मेन या क्लबशी करार केला आहे. त्यामुळे मेस्सीच्या अनेक वस्तूंच्या प्रतिकृतीही आता बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. ‘मर्काडो लिबर’ या लोकप्रिय वेबसाईटवर आता हा टिश्यू पेपर १० लाख डॉलरला उपलब्ध आहे, असे अर्जेंटिनातील मिसिअन्स ऑनलाइन या मीडियाने म्हटले आहे.

‘कम्प्लिट स्पोर्टस’ने म्हटले आहे की, या भावनिक अशा पत्रकार परिषदेनंतर एका अज्ञात माणसाने हा टिश्यू पेपर उचलला आणि ऑनलाइन विक्री करण्याचे ठरविले. योग्य किंमत मिळाली तर आपण तो विकू असे त्याने म्हटले होते. एवढेच नव्हे तर त्या माणसाने असेही लिहिले होते की, या टिश्यू पेपरमध्ये मेस्सीच्या अनुवांशिक पदार्थाचा समावेश असल्यामुळे त्यापासून मेस्सीप्रमाणेच एखादा ‘क्लोन’ खेळाडू तयारही करता येऊ शकतो. सध्या या वेबसाईटवर हा टिश्यू पेपर उपलब्ध असल्याचे दिसत नाही पण त्याचा स्क्रीनशॉट सध्या सगळीकडे व्हायरल झाला आहे. त्यामुळे या दाव्याविषयी शंका उपस्थित केली जात आहे.

हे ही वाचा:

सैफ-अर्जूनच्या ‘भूत पोलिस’ चा ट्रेलर प्रदर्शित

प्रदूषणमुक्तीच्या नव्या प्रकल्पाला पालिकेची ‘मिठी’

मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेलाही थोडे ब्रह्मज्ञान द्यावे

तालिबानी पिलावळीचा धोका…

केवळ टिश्यू पेपरच नव्हे तर त्याच्या प्रतिकृतीही आता ऑनलाइन विक्रीस उपलब्ध आहेत. त्यासोबत मेस्सीचा पत्रकार परिषदेतील रडतानाचा फोटोही ठेवण्यात आला आहे. मेस्सीच्या नव्या क्लबची म्हणजे पॅरिस सेंट जर्मेनच्या जर्सीनाही आता भरघोस किंमत मिळत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा