जगप्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी हा सध्या राहत असलेल्या एका पंचतारांकित हॉटेलच्या खोलीत चोरी झाली आहे. मेस्सी सध्या पॅरिस सेंट जर्मन (पीएसजी) क्लबकडून युरोपियन लीगचे सामने खेळण्यासाठी पॅरिसमधील ‘ले रॉयल मॉन्स्यू’ या पंचतारांकित हॉटेलमध्ये आपली कुटुंबासोबत वास्तव्यास आहे. या हॉटेलमध्ये ही चोरीची घटना घडली.
चोरट्यांनी हॉटेलच्या छतावरून मेस्सीच्या खोलीत प्रवेश केला. चोरट्यांनी मेस्सीच्या खोलीतून लाखो रुपयांचे दागिने लंपास केले. या हॉटेलमधील मुक्कामासाठी मेस्सी सध्या दिवसासाठी २३ हजार डॉलर्स इतकी किंमत मोजत आहे. मेस्सीने ऑगस्टमध्येच बार्सिलोना सोडले असले तरी तो अद्याप त्याच्या घरी गेलेला नाही.
हे ही वाचा:
नवी मुंबईत इलेक्ट्रिक बस वाचवणार ‘इतके’ डिझेल!
शिवसेनेचा सत्ताग्रह! ठाणे महापालिकेत गांधींचा विसर
… म्हणून एसटी बसमधील दिवे सुरूच राहणार!
मी स्वतः भारतीय लस घेतली आहे, यूएनजीए अध्यक्षांनी जगाला सांगितले
या चोरीमध्ये चोरट्यांनी मेस्सीचे सुमारे ४० हजार डॉलर्स किंमतीचे दागिने आणि १५ हजार डॉलर्सची रोकड चोरी केली आहे. हॉटेल व्यवस्थापन आणि स्थानिक पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या हॉटेलमध्ये मेस्सी रहायला आल्यापासून हॉटेलची सुरक्षा अधिक वाढवण्यात आली होती, असे असताना ही चोरी घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
सुरक्षा व्यवस्थेमध्ये गंभीर त्रुटी असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. चोरी कोणा अनुभवी टोळीकडून केली गेली असल्याचे पुरावे हाती लागत आहेत. मेस्सी नुकताच बार्सिलोनाला सोडचिठ्ठी देऊन पीएसजीमध्ये सामील झाला आहे.