अर्जेंटिनाचा अव्वल दर्जाचा खेळाडू आणि संघाचा कर्णधार लिओनेल मेस्सी हा लवकरच निवृत्त होणार आहे. कतारमध्ये होणारा फिफा विश्वचषक २०२२ हा त्याचा अखेरचा विश्वचषक असणार आहे हे मेस्सीने स्पष्ट केलं आहे. ईएसपीएनशी (ESPN-Argentina) बोलत असताना मेस्सीने हे वक्तव्य केलं आहे.
कतारमध्ये होणारा विश्वचषक हा मेस्सीचा पाचवा विश्वचषक असणार आहे. मात्र, अद्याप मेस्सी याने एकदाही विश्वचषक जिंकलेला नाही. २०१४ मध्ये अर्जेंटिना अंतिम फेरीमध्ये पोहचला होता. मात्र, अटीतटीच्या अंतिम सामन्यात जर्मनीकडून अर्जेंटिनाचा पराभव झाला होता. आता यंदाचा विश्वचषक त्याचा अखेरचा असेल हे त्याने स्वत: सांगतिलं असून तो म्हणाला, “हा नक्कीच माझा शेवटचा विश्वचषक आहे.”
विश्वचषक स्पर्धेमध्ये काहीही होऊ शकतं. सर्वच सामने कठीण असतात. उत्तम कामगिरी करणारा संघ प्रत्येकवेळी जिंकेलच असं नाही, असं मेस्सी म्हणाला.
Messi says Qatar World Cup will "surely" be his last
Read @ANI Story | https://t.co/Do7T0MArz0
#LionelMessi #Argentina #FIFAWorldCup #FIFA pic.twitter.com/FaR8vOjPx1— ANI Digital (@ani_digital) October 6, 2022
फुटबॉल जगतातील मानाचा समजला जाणारा बलॉन डी’ऑर हा खिताब मेस्सीने सर्वाधिक सात वेळा मिळवला आहे. मात्र, अर्जेंटिना देशाला विश्वचषक जिंकवूण देण्याची त्याची इच्छा अद्याप अपूर्ण आहे.
हे ही वाचा:
चिथावणीखोर वक्तव्य करणारे जुबेर, प्रतिक सिन्हा नोबेलसाठी नामांकित
बंगालमध्ये दुर्गा विसर्जनात मोठी दुर्घटना,आठ मृत्यू
‘उद्धवराव, लोकांशी तुम्ही बेईमानी केली, २०१९ला तुम्ही गद्दारी केली’
मुकेश अंबानी यांना पुन्हा धमकीचा कॉल
फुटबॉल विश्वचषक यंदा कतार येथे पार पडणार आहे. माहितीनुसार विश्वचषक स्पर्धा आधी २१ नोव्हेंबर २०२२ पासून सुरू होणार होती मात्र, आता ही स्पर्धा २० नोव्हेंबर २०२२ रोजी सुरू होणार आहे.