फुटबॉल वर्ल्डकपमध्ये सर्वांचे लक्ष मेस्सीच्या कामगिरीकडे होते आणि त्याने कुणालाही निराश केले नाही. प्रत्यक्ष सामन्यात त्याने दोन गोल केलेच पण पेनल्टी शूटआऊटमध्येही त्याने एक गोल करत अर्जेंटिनाच्या वर्ल्डकप विजेतेपदात मोलाचा हातभार लावला.
२३व्या मिनिटाला त्याने पेनल्टीवर आपला पहिला गोल केला आणि अर्जेंटिनाचे खाते उघडले. त्यानंतर जादा वेळेत १०८व्या मिनिटाला दुसरा गोल करत आपल्या संघाला ३-२ अशी आघाडीही मिळवून दिली. पण नंतर फ्रान्सच्या एमबापेने बरोबरी केल्यामुळे अखेर पेनल्टी शूटआऊटद्वारे निर्णय लागणार हे स्पष्ट झाले. त्यातही त्याने एक गोल केला.
पेलेने वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत १३ गोल केले असून ब्राझीलचे सार्वकालिक महान खेळाडू पेले यांनाही त्याने मागे टाकले पण तो सर्वाधिक गोल नोंदविणाऱ्यांत संयुक्तपणे चौथा आहे.
जर्मनीचा मिरोस्लाव्ह क्लोस (१६), ब्राझिलचा रोनाल्डो (१५), जर्मनीचा गर्ड म्युलर (१४) तर फ्रान्सचा फॉन्टेन आणि मेस्सी हे १३ गोलसह चौथ्या क्रमांकावर आहेत.
हे ही वाचा:
हिजाबला विरोध करणाऱ्या ऑस्कर विजेत्या अभिनेत्रीला अटक
मेस्सीच्या अर्जेंटिनाला वर्ल्डकप; जिंकले ३ अब्ज ४७ कोटी रुपयांचे इनाम
आफताबनंतर आता पत्नीच्या शरीराचे तुकडे करणारा आणखी एक नराधम सापडला
मुंबईत कार आणि एसयूव्हीच्या नोंदणीत ३६ टक्क्यांनी वाढ
मेस्सी हा या वर्ल्डकपमध्ये प्रत्येक फेरीत एखादा तरी गोल नोंदविणारा एकमेव खेळाडू ठरला आहे. त्याने गटस्तरावर, उपउपांत्यपूर्व फेरीत, उपांत्यपूर्व फेरीत, उपांत्य फेरीत तसेच अंतिम फेरीतही गोल केले आहेत. अशी कामगिरी एकाच स्पर्धेत आतापर्यंत कुणीही केलेली नाही.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या सामन्याचे कौतुक करत आतापर्यंतचा सर्वाधिक थरारक आणि रोमांचक असा सामना असल्याचे ट्विट करून म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सचीही पाठ थोपटली आहे. आपल्या कौशल्याच्या जोरावर फ्रान्सनेही आपल्या चाहत्यांना मंत्रमुग्ध केल्याचे पंतप्रधान म्हणाले.