मेस्सीचा नवा संघ ठरला?

मेस्सीचा नवा संघ ठरला?

जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूंपैकी एक असलेला लिओनेल मेस्सी याने बार्सिलोना संघाला निरोप दिला. त्यानंतर मेस्सी कोणत्या संघाकडून खेळणार याची चर्चा सुरू झाली होती. पण आता हा सस्पेंस लवकरच संपणार असे दिसत आहे.

मेस्सी हा लवकरच पिएसजी अर्थात पॅरिस सेंट जर्मन या फुटबॉल क्लबकडून खेळताना दिसू शकतो. ‘ईएसपीएन एफसी’ या ट्विटर हँडलवरून या संबंधीचे ट्विट करण्यात आले आहे. या संबंधीची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार आहे. पिएसजी संघाचा चाहता वर्ग या बातमीमुळे फारच खुश झाला आहे.

पिएसजी हा फ्रान्समधील लिग १ या फुटबॉल स्पर्धेतील एक महत्वाचा संघ आहे. फ्रान्सचा एमबापे, ब्राझीलचा नेमार असे स्टार फुटबॉलपटू सध्या या संघाकडून खेळतात. त्यात जर मेस्सीच्या जलव्याची भर पडली तर ती फुटबॉल चाहत्यांसाठी पर्वणी ठरेल असे म्हटले जात आहे. या आधी नेमार आणि मेस्सी हे दोघेही बार्सिलोना या संघाकडून एकत्र खेळत होते.

हे ही वाचा:

ऑगस्ट क्रांतिदिनी काँग्रेस नेत्याच्या फेसबुकवर ‘कांती’च्या मशाली

टोकियो ऑलिम्पिकनंतर आणखीन एक क्रीडा स्पर्धा गाजवायला भारत सज्ज

चारशे कोटींचे खाशाबांचे स्टेडियम महाराष्ट्रात का नाही?

१५ ऑगस्टचे ध्वजारोहण रोखा आणि दहा लाख डॉलर कमवा

दरम्यान ८ ऑगस्ट रोजी बार्सिलोना येथे मेस्सीचा निरोप समारंभ पार पडला. या वेळी मेस्सी खूपच भावुक झालेला दिसला. बार्सिलोना हे आपले घर आहे. मी आणि माझ्या कुटुंबियांनी हे निश्चित केले होते की यावर्षी घरी थांबायचे. पण हा अशाप्रकारचा निरोप घेणे खूपच जड जाते आहे असे मेस्सीने यावेळी बोलताना सांगितले. यावेळी मेस्सीच्या डोळ्यात अश्रू तरारले होते. तर मेस्सीचे सर्व सहकारी खेळाडू आणि क्लबच्या व्यवस्थापनेतील सदस्यही भावुक झालेले दिसले.

Exit mobile version