सागरी जैवविविधता आणि स्वच्छता मोहिमेसाठी सामंजस्य करार

यामुळे मुंबईतील सागरी किनारे आता स्वच्छ होणार

सागरी जैवविविधता आणि स्वच्छता मोहिमेसाठी सामंजस्य करार

फॉर फ्युचर इंडिया’ ने “मॅन्ग्रोव्ह फाउंडेशन, महाराष्ट्र सरकार” सोबत ठाणे व मुंबई भागातील खारफुटी आणि सागरी जैवविविधता संरक्षण आणि स्वच्छता मोहिमेसाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. “फॉर फ्युचर इंडिया” संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष हर्षद ढगे आणि “मॅन्ग्रोव्ह फाउंडेशन, महाराष्ट्र सरकार” यांनी दुसऱ्यांदा ठाणे व मुंबई भागातील खारफुटी आणि सागरी जैवविविधता संरक्षण आणि स्वच्छता मोहिमेसाठी  सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. या सामंजस्य करारामध्ये ‘महाराष्ट्र वन विभाग व मॅन्ग्रोव्ह फाउंडेशन’ कडून ठाणे व मुंबई भागातील खारफुटी आणि सागरी जैवविविधता संरक्षण आणि स्वच्छता मोहिमेसाठीच्या मदतीचा मुद्धा स्पष्ट केला आहे.

मागील वर्षी झालेल्या सामंजस्य करारामध्ये महाराष्ट्र वन विभाग व मॅन्ग्रोव्ह फाउंडेशन च्या मदतीने “फॉर फ्युचर इंडिया” संस्थेने वर्षभरात मिरा भाईंदर पूर्व खाडी व पश्चिम खाडी, बोरिवली येथील गोराई खाडी, मालाड येथील मानोरी समुद्रकिनारी ३० वेळा कांदळवन स्वच्छता अभियान राबविले ज्यात ४४८० स्वयंसेवकांनी सहभाग घेत ९५,००० किलोहून अधिक प्लास्टिक कचरा, निर्माल्य, काचेच्या बाटल्या व इतर कचरा काढला. ज्यामुळे कांदळवनाची वाढ होण्यास मदत झाली तर अनेक युवांना तसेच स्थानिकांना कांदळवनाचे महत्व पटवून देण्यास मदत मिळाली.

हे ही वाचा:

अमेरिकेने फोडला चीनचा फुगा; चीनने व्यक्त केला संताप

श्रीराम आणि सीतामाईना मूर्त स्वरूप देणारे मराठमोळे हात

पुणेकर लवकरच घेणार डबलडेकर प्रवासाचा आनंद

आशियातला पहिला हेलिकॉप्टर कारखाना बनवण्याचा बहुमान भारताला

यावेळी श्री.आदर्श रेड्डी सर – उप वनसंरक्षक (मँग्रोव्ह सेल) आणि सहसंचालक (मॅन्ग्रोव्ह फाउंडेशन), श्री.लक्ष्मीकांत देशपांडे जी – सीनियर मॅनेजर (गोदरेज अँड बॉयस, इंडिया येथील मॅंग्रोव्हज), डॉ. श्रीमती शीतल पाचपांडे जी – डेप्युटी डायरेक्टर प्रोजेक्ट (मँग्रोव्ह फाउंडेशन), डॉ. श्री. मानस मांजरेकर जी – उपसंचालक संशोधन आणि क्षमता बांधणी (मॅन्ग्रोव्ह फाउंडेशन), “फॉर फ्युचर इंडिया” संस्थेचे सचिव श्री. सिद्धेश कांबळे, सह संस्थापक श्री. ध्रुव कडारा, वनाधिकारी व महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते.
“या सामंजस्य कराराने खारफुटी आणि सागरी जैवविविधताचे संरक्षण करण्यास आणि स्वच्छता मोहिमेस योग्य चालना मिळेल, तसेच खारफुटी संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावेल.” असे संस्थेच्या संस्थापक व अध्यक्ष हर्षद ढगे यांनी सांगितले आहे.

Exit mobile version