आणि युरोपियन संसदेत महिलेने केस कापत केला निषेध

इराणी महिलांवर होत असलेल्या अत्याचाराचा अबीर अल-सहलानी यांनी निषेध केला आहे.

आणि युरोपियन संसदेत महिलेने केस कापत केला निषेध

इराणमध्ये सुरू हिजाबविरोधी निदर्शने सुरु आहेत. निदर्शनांमध्ये इराणी महिला हिजाब जाळून टाकताना दिसत आहेत. हिजाब न घातल्याने इराणमध्ये पोलिसांच्या क्रूरतेला महसा अमिनी ही विद्यार्थिनी बळी पडली. या घटनेमुळे इस्लामिक देशात पुन्हा निदर्शने सुरू झाली आहेत. जगातील बहुतेक देश हे इराणी महिलांच्या आंदोलनाला पाठींबा दर्शवत आहेत. या निदर्शनांदरम्यान युरोपियन संसद सदस्याने संसदेत चर्चेदरम्यान आपले केस कापले आहेत.

स्ट्रासबर्ग येथे स्वीडिश नेत्या अबीर अल-सहलानी चर्चेला संबोधित करत होत्या. चर्चा सुरु असताना त्यांनी इराणी महिलांच्या निदर्शनाबद्दल भाष्य केले आणि स्वतःचे केस कापायला सुरुवात केली. इराणी महिलांवर होत असलेल्या अत्याचाराचा अबीर अल-सहलानी यांनी निषेध केला आहे. जोपर्यंत इराणच्या महिला मुक्त होत नाहीत, तोपर्यंत आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहणार आहोत, असे यावेळी त्या म्हणाल्या. अबीर अल-सहलानी यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये ती युरोपियन संसदेच्या सदस्यांसमोर केस कापताना दिसत आहेत.

हे ही वाचा:

चिथावणीखोर वक्तव्य करणारे जुबेर, प्रतिक सिन्हा नोबेलसाठी नामांकित

बंगालमध्ये दुर्गा विसर्जनात मोठी दुर्घटना,आठ मृत्यू

‘उद्धवराव, लोकांशी तुम्ही बेईमानी केली, २०१९ला तुम्ही गद्दारी केली’

मुकेश अंबानी यांना पुन्हा धमकीचा कॉल

युरोपियन संसदेचे सदस्य अबीर अल-सहलानी म्हणाल्या की, इराणी महिलांनी सलग तीन आठवडे धैर्य दाखवले आहे. ते स्वातंत्र्यासाठी प्राण देत आहेत. आता मीडियात बोलून चालणार नाही, कारवाई करण्याची वेळ आली आहे. इराणमधील धर्मगुरूंचे हात रक्ताने माखले आहेत. ते त्यांच्याच लोकांविरुद्ध मानवतेविरुद्ध करत असलेल्या गुन्ह्यांसाठी इतिहास किंवा सर्वशक्तिमान देव त्यांना माफ करणार नाही. इराणमधील स्त्री-पुरुषांवर होणारा सर्व हिंसाचार बिनशर्त तात्काळ थांबवावा, अशी मागणी युरोपियन युनियनचे लोक आणि युरोपातील नागरिकांची असल्याचे अबीर अल-सहलानी यांनी सांगितले आहे.

Exit mobile version