‘जयशंकर हे आधुनिक भारत-अमेरिकी संबंधांचे शिल्पकार’

अमेरिकेने केले परराष्ट्रमंत्र्यांचे कौतुक

‘जयशंकर हे आधुनिक भारत-अमेरिकी संबंधांचे शिल्पकार’

अमेरिकी प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे कौतुक केले आहे. बायडन प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना ‘आधुनिक भारत आणि अमेरिकेच्या संबंधांचे शिल्पकार’ असे संबोधले आहे. भारत आणि अमेरिकेदरम्यान द्विपक्षीय संबंध दृढ करण्यात जयशंकर यांनी विशेष भूमिका बजावली आहे, असे या अधिकाऱ्यांनी नमूद केले आहे.

 

अमेरिकेतील भारतीय राजदूत तरणजीत सिंग संधू यांनी परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्या सन्मानार्थ एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात बायडन प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी अमेरिकी सर्जन जनरल विवेक मूर्ती, राज्याचे उपसचिव रिचर्ड वर्मा, राष्ट्रपती बायडेन यांचे अंतर्गत निती सल्लागार नीरा टंडन, व्हाइट हाऊस कार्यालयाचे राष्ट्रीय औषध नियंत्रण नितीचे संचालक डॉ. राहुल गुप्ता आणि राष्ट्रीय विज्ञान फाऊंडेशनचे संचालक डॉ. सेथुरमन पंचनाथन सहभागी झाले होते. या दरम्यान अधिकाऱ्यांनी जयशंकर यांना आधुनिक भारत आणि अमेरिकेच्या संबंधांचे शिल्पकार संबोधले.

 

हे ही वाचा:

जीपीएसचा अंदाज चुकला, कार नदीत कोसळून दोन डॉक्टरांचा मृत्यू!

मणिपूरमध्ये विद्यार्थ्यांच्या हत्येप्रकरणी चार अटकेत

स्केटिंग रिलेमध्ये भारताची दोन कांस्य पदकांची कमाई

संजय राऊतांच्या नावाचा वापर करून सुजीत पाटकरांनी मिळवले जम्बो कोविड सेंटरचे टेंडर

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या अमेरिकेच्या नऊदिवसीय दौऱ्याची रविवारी सांगता झाली. दौऱ्याच्या अखेरच्या दिवशी जयशंकर यांनी ‘एक्स’वर एक पोस्ट जाहीर केली. त्यामध्ये त्यांनी त्यांच्या अमेरिकी दौऱ्यातील काही महत्त्वाच्या क्षणांचा व्हिडीओ जाहीर केला आहे. तसेच त्यांनी ‘भारत आणि अमेरिका : क्षितिजाचा विस्तार’ अशी फोटोळही दिली आहे. या व्हिडीओत त्यांनी परराष्ट्र मंत्री अँथनी ब्लिंकन, संरक्षण सचिव लॉइड ऑस्टिन, वाणिज्य सचिव जीना रायमोंडो आणि व्यापार प्रतिनिधी कॅथरीन ताई यांच्याह अन्य अधिकाऱ्यांच्या घेतलेल्या गाठीभेटींचे काही क्षण दाखवले आहेत.

Exit mobile version