महापौरांनी पदक दातात धरले आणि…

महापौरांनी पदक दातात धरले आणि…

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत यश मिळवलेल्या खेळाडूसाठी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. जपानमधील नागोया शहरात हा सत्कार सोहळा आयोजित केला होता. त्यावेळी शहराचे महापौर उपस्थित होते.

त्यांनी गंमत म्हणून खेळाडूचे सुवर्ण पदक दातात पकडून वाकवले. त्यामुळे हे पदक खराब झाले. पण या खराब झालेल्या सुवर्णपदकाऐवजी दुसरे पदक तिला बदलून मिळणार आहे.

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये जपानच्या संघाने सॉफ्टबॉल स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले. या संघातील खेळाडू मिऊ गोटा हिचा सत्कार सोहळा नागोया शहरात आयोजित केला होता. त्यावेळी शहराचे महापौर ताकाशी कावामुला यांनी गमतीने गोटा हिचे सुवर्णपदक दातात धरले आणि त्या पदकाचा आकार बदलून ते खराब झाले.

हे ही वाचा:

राहुल गांधींना निलंबित करा

कंदहार पडले, तालिबानची राजवट अटळ?

लॉर्ड्स कसोटीचा पहिला दिवस भारताच्या नावावर

दोन लसी घेतलेल्यांचे ‘तिकीट कापले’

आपल्याला नवे पदक द्यावे अशी मागणी माऊ गोटा हिने केली होती. तिची मागणी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती आणि टोकियो ऑलिम्पिक समितीनेही मान्य केली आहे. तिच्या पदकाचा खर्च आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती करणार आहे.

Exit mobile version