मॉरिशस सरकारने मेट्रो एक्सप्रेस प्रकल्पासाठी भारताच्या पाठिंब्याबद्दल अनोख्या पद्धतीने कृतज्ञता व्यक्त केली आहे. मॉरिशस देशातील एका प्रमुख मेट्रो स्टेशनला ‘महात्मा गांधी’ यांचे नाव देण्याचा निर्णय मॉरिशस सरकारने घेतला आहे. अशी माहिती मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ यांनी दिली.
“मला हे सांगण्याचा विशेषाधिकार आहे की मेट्रो एक्स्प्रेस प्रकल्पाला भारताने दिलेल्या पाठिंब्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. आणि आमची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, माझ्या सरकारने एका मोठ्या मेट्रो स्टेशनचे नाव ‘महात्मा गांधी’ स्टेशन ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. असे पंतप्रधान जुगनाथ म्हणाले.
याशिवाय, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत संयुक्तपणे प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण केले. काल म्हणजेच गुरुवारी पीएम मोदी आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ ऑनलाइन कार्यक्रमात सहभागी झाले होते. कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, सागरी सुरक्षेसह इतर क्षेत्रांमध्ये भारत आणि मॉरिशस यांच्यातील सहकार्यामुळे या क्षेत्रातील सर्वांसाठी सुरक्षा आणि विकास ही संकल्पना जमिनीवर साकार होताना दिसून आली आहे.
हे ही वाचा:
राजनाथ सिंह यांची थट्टा; पण ग्रीस धर्मगुरुंनी केलेली राफेलची पूजा कौतुकास पात्र?
स्थायी समितीत बोलू न दिल्याच्या निषेधार्थ भाजपा सदस्यांचे धरणे आंदोलन
लखनऊमध्ये लव्ह जिहादच्या प्रकारानंतर खळबळ; यासिनने केला पत्नी शिवाचा खून
ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे विद्यार्थिनीवर अत्याचार….त्यातून संपवले जीवन
जुगनाथ त्यावेळी म्हणाले, विकासासाठी सहकाऱ्याचा भारताचा दृष्टीकोन भागीदार देशांच्या गरजा आणि प्राधान्यांची काळजी घेणे आणि त्यांच्या सार्वभौमत्वाचा आदर करणे, लोकांचे कल्याण आणि त्यांची क्षमता मजबूत करणे यावर केंद्रित आहे.
मेट्रो एक्स्प्रेस प्रकल्प आणि इतर पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी भारताकडून मॉरिशसला १९० दशलक्ष डॉलर कर्जाची लाइन ऑफ क्रेडिट देण्याबाबत करारावर स्वाक्षरी करण्यात आली. तसेच, त्यावेळी लहान विकास प्रकल्पांच्या अंमलबजावणीबाबत सामंजस्य कराराची देवाणघेवाण झाली. भारत-मॉरिशस द्विपक्षीय संबंध अर्ध्या शतकाहून अधिक जुने असल्याचा उल्लेख पंतप्रधान मोदी यांनी त्यावेळी केला.