दक्षिण पूर्व युरोपमधील देश असलेल्या उत्तर मॅसेडोनियामध्ये भीषण आगीची घटना घडली असून या दुर्घटनेत ५१ जणांचा मृत्यू झाला आहे. कोकानी येथील पल्स नाईट क्लबमध्ये लागलेल्या भीषण आगीत ५१ जणांचा मृत्यू झाला तर १०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत, असे गृहमंत्री पंचे तोशकोव्स्की यांनी सांगितले.
“आमच्याकडे आतापर्यंत असलेल्या आकडेवारीनुसार, ५१ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे आणि १०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींना सध्या स्टिप, कोकानी आणि स्कोप्जे येथील रुग्णालयात नेण्यात आले आहे,” अशी माहिती तोशकोव्स्की यांनी पत्रकारांना दिली आहे. तोशकोव्स्की म्हणाले की, स्थानिक पॉप ग्रुपच्या कॉन्सर्ट दरम्यान पहाटे २:३५ वाजता आग लागली.
या संगीत कार्यक्रमात अंदाजे १,५०० लोक उपस्थित होते, परंतु सुरुवातीच्या उद्रेकानंतरही काही तासांपर्यंत कार्यक्रमस्थळ आगीने पेटलेले राहिले. फुटेजमध्ये स्टेजमधून निघणाऱ्या ठिणग्या छताला पेटवत असल्याचे दिसून येत आहे, ज्वाळा क्लबमध्ये वेगाने पसरत आहेत. अधिकाऱ्यांनी या घटनेची सखोल चौकशी करणे अपेक्षित आहे.
याव्यतिरिक्त, आरोग्य मंत्री अरबीन तारावरी म्हणाले की, ११८ लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि त्यांना शेजारील देशांकडून मदतीचे आश्वासन मिळाले आहे. या दुर्घटनेत सहभागी असलेल्या तरुणांचे शक्य तितके जीव वाचवण्यासाठी आमच्या सर्व क्षमतांचा वापर करण्यात आला आहे, असे तारावरी यांनी पत्रकारांना सांगितले.
हे ही वाचा..
पाक लष्कराच्या ताफ्यावर हल्ला; ९० सैनिक ठार झाल्याचा बलुच लिबरेशन आर्मीचा दावा
अफझलखान, औरंगजेबची कबर नष्ट केल्याशिवाय राहणार नाही
छोट्या व्यापाऱ्यांना मिळणार समान संधी
सुनीता विल्यम्स यांचा माघारी येण्याचा मार्ग मोकळा; नासाचे पथक अंतराळ स्थानकावर पोहोचले
अलिकडच्या काळात घडलेली ही सर्वात वाईट दुर्घटना आहे. पंतप्रधान हिस्टिजान मिकोस्की यांनी पोस्ट करत म्हटले आहे की, “हा मॅसेडोनियासाठी एक कठीण आणि अतिशय दुःखद दिवस आहे. इतक्या तरुणांचे प्राण गमावणे हे दुर्दैवी आहे. पीडितांच्या कुटुंबाचे, प्रियजनांचे दुःख अतुलनीय आहे. या सर्वात कठीण क्षणांमध्ये त्यांचे दुःख कमी करण्यासाठी आणि त्यांना मदत करण्यासाठी लोक आणि सरकार त्यांच्या शक्तीनुसार सर्वकाही करतील.”