पाकिस्तानमधील क्वेटा रेल्वे स्थानकावर भीषण स्फोट; २२ हून अधिक जणांचा मृत्यू

स्फोटात ५० हून अधिक जण जखमी

पाकिस्तानमधील क्वेटा रेल्वे स्थानकावर भीषण स्फोट; २२ हून अधिक जणांचा मृत्यू

पाकिस्तानमधील क्वेटा रेल्वे स्थानकावर भीषण स्फोट झाला असून मोठी जीवितहानी झाली आहे. क्वेट्टा येथे झालेल्या स्फोटात २२ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून सुमारे ५० हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती आहे. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, क्वेटा रेल्वे स्थानकाजवळ हा बॉम्बस्फोट झाला. ट्रेन प्लॅटफॉर्मवर येण्याआधीच बॉम्बचा स्फोट झाला. स्फोट झाला त्यावेळी फलाटावर प्रवाशांची मोठी गर्दी होती. माहितीनुसार, मृतांचा आकडा वाढू शकतो. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून बॉम्ब निकामी पथक सुद्धा घटनास्थळी पोहचले आहे.

मीडियाच्या वृत्तानुसार, सकाळी ९ वाजता पेशावरला जाणाऱ्या जफर एक्सप्रेस ट्रेनमध्ये चढण्यासाठी प्रवासी प्लॅटफॉर्मवर जमले असताना हा स्फोट झाला. हा स्फोट पाकिस्तानी लष्कराच्या जवानांना लक्ष्य करून करण्यात आला होता. बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढा उभारणाऱ्या बलुच लिबरेशन आर्मीच्या (बीएलए) मजीद ब्रिगेडने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे, अशी माहिती आहे. ‘नवभारत टाईम्स’ने या संदर्भात वृत्त दिले आहे. क्वेट्टा येथील रेल्वे स्थानकावर लष्करी जवानांना लक्ष्य करून आत्मघातकी बॉम्बस्फोट घडवून आणल्याचे दहशतवादी गटाने म्हटले आहे.

खोरासान डायरीने क्वेट्टाच्या एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने म्हटले आहे की, “जफर एक्स्प्रेससाठी लोक वाट पाहत असताना काही सुरक्षा कर्मचारी तिथे बसले होते, तेव्हा एका आत्मघाती हल्लेखोराने स्वतःला स्फोट घडवून आणले. या स्फोटात अनेक नागरिकांचाही मृत्यू झाला आहे.”

हे ही वाचा:

मुंबईत बांगलादेशी, रोहिंग्या वाढतील, २०५१ पर्यंत हिंदू राहतील ५४ टक्के

ब्रिटिशांनी जे षडयंत्र रचले नाही, ते राहुल गांधींनी रचले!

काँग्रेस आणि त्यांच्या चेल्यांनी खोटे बोलण्याचे दुकान महाराष्ट्रात लावलंय

पूर्व उपनगरातील ५३ सराईत गुन्हेगारांना करण्यात आले तडीपार

स्फोटाची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. मृत आणि जखमींची संख्या पाहता क्वेट्टा रुग्णालयात आणीबाणी लागू करण्यात आली आहे. डॉक्टरांसह जादा कर्मचाऱ्यांनाही पाचारण करण्यात आले आहे. जखमींवर उपचार सुरू आहेत. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढू शकतो, असा अंदाज आहे.

Exit mobile version