चीनमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, नववर्ष आणि सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रांत मास्क सक्ती नाही पण काळजी आवश्यक असल्याची माहिती आहे. कोरोनामुळे महाराष्ट्रात परिस्थिती गंभीर नाही, काळजी घ्या घाबरून जाऊ नका असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी केले आहे.
लवकरचं नवीन वर्षाचे आगमन होणार असून, महाराष्ट्रातील सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्ट्या सुरु झाल्या आहेत. त्यामुळे बरेच लोक नववर्षाचे स्वागत आणि सुट्ट्या साजऱ्या करण्यासाठी बाहेरगावी जातात. या अनुषंगाने महाराष्ट्र सरकारने कोणतेही निर्बंध पर्यटकांना घातलेले नाहीत. पण, लोकांनी काळजी घेणे आवश्यक असून यात मास्क घालणे आणि सामाजिक अंतर आवश्यक असल्याचे सांगण्यात येत आहे. यासंदर्भात मास्क सक्ती नसल्याचे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान महाराष्ट्रात कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात आजपासून कर्मचाऱ्यांना मास्क सक्ती करण्यात आली आहे. पण भक्तांना सक्ती नाही तर पंढरपूर विठ्ठल मंदिरात आज मास्कबाबत निर्णय होणार आहे. शिर्डी देवस्थान, पुण्यातील दगडूशेठ मंदिराने आणि मुंबईतील मुंबादेवी मंदिराने भक्तांना मास्क घालण्याचे आवाहन केलं आहे. नाशिक येथील त्र्यंबकेश्वर मंदिरात सुद्धा कर्मचारी आणि भाविकांनासुद्धा मास्क घालणे खबरदारी घेण्यासाठी सांगितल्याचे कळते.
काय खबरदारी घ्याल
- बूस्टर लस ताबडतोब घ्या.
- मास्क घाला आणि सुरक्षित अंतर राखा.
- समजा कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
- गरज नसल्यास इस्पितळात दाखल होणे टाळा
केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी राज्याच्या आरोग्य मंत्र्यांसोबत कोविड-19 परिस्थिती आणि तयारीबाबत बैठक घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी कोविडच्या पार्श्वभूमीवर एका उच्चस्तरीय बैठक आयोजित केली होती. त्यात त्यांनी वाढीव चाचणीवर भर देण्यास सांगितले आणि लक्ष ठेवण्यास सांगितले आहे.
हे ही वाचा :
इस्लामाबादमध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट, एका पोलिसाचा मृत्यू
शिकलात तर याद राखा! अफगाणिस्तानात विद्यापीठे, लायब्ररीतून हाकलले महिलांना
आजच्या शेतकरी दिनाचं महत्व काय?
आम्ही करू ते कौतुक, तुम्ही कराल तो अपमान
कोविड-19 च्या नवीन आलेला प्रकार आणि त्यांच्या सार्वजनिक आरोग्यावरील परिणामांचे देखील मूल्यांकन केले. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या शुक्रवारी दिलेल्या आकडेवारीनुसार, देशात १६३ नवीन कोरोना व्हायरस संक्रमण नोंदले गेले आहे. तर सक्रिय प्रकरणे तीन हजार ३८० वर घसरली आहेत.
केरळमध्ये सहा मृत्यू झाले आहेत, तर गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात दोन आणि दिल्लीतून एक मृत्यू झाला आहे. सकाळी ८ वाजता अपडेट केलेल्या आकडेवारीनुसार, एकूण संसर्गाच्या ०.०१ टक्के सक्रिय प्रकरणे आहेत, तर राष्ट्रीय कोविड- 19 पुनर्प्राप्ती दर ९८.८० टक्क्यांपर्यंत वाढला आहे, असे मंत्रालयाने सांगितले आहे.