आम्ही घरूनच काम करणार, म्हणत कर्मचाऱ्यांनी दिला राजीनामा

आम्ही घरूनच काम करणार, म्हणत कर्मचाऱ्यांनी दिला राजीनामा

कोरोना महामारीमुळे पूर्ण जगामध्ये लॉकडाऊन लागले होते. त्यामुळे सुमारे दोन वर्ष कार्यालये बंद होती, त्यांनतर आता अनेक कार्यालये पुन्हा सुरु झाली आहेत. मात्र दोन वर्ष घरून काम करण्याची सवय लागल्याने अनेक कर्मचाऱ्यांना कार्यालयात जाऊन काम करणे नको झाले आहे. नुकतीच व्हाईटहॅट ज्युनियरने कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलवल्यानंतर ८०० हुन अधिक कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिला आहे.

व्हाईटहॅट ज्युनियरने कर्मचाऱ्यांना १८ मार्च रोजी ईमेल पाठवून मुंबई, बेंगळुरू आणि गुरुग्राम येथील कार्यालयात परत जाण्यास सांगितले, त्यांना स्थलांतरासाठी एक महिन्याची मुदत दिली. त्यांनतर व्हाईटहॅट ज्युनियरने कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलवल्यानंतर दोन महिन्यांच्या आत ८०० कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. या कर्मचाऱ्यांच्या राजीनाम्याचे कारण म्हणजे या कर्मचाऱ्यांना कार्यालयातून पुन्हा काम सुरु करायचे नव्हते.

कर्मचार्‍यांना कार्यालयात परत बोलावणे हे सामूहिक राजीनामे होण्याचे सर्वात मोठे कारण असल्याचे सांगितले जात आहे. परंतु काही कर्मचार्‍यांनी पगारामुळे राजीनामा दिल्याचा अंदाजही अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. मात्र व्हाईटहॅट ज्युनियरने आरोप फेटाळून लावले आहेत.

हे ही वाचा:

संभाजी राजेंच्या नव्या संघटनेची घोषणा

मुंब्र्यात वसुली सरकार, पोलिसांनीच व्यापाऱ्याला लुटले

पद्मश्री डॉ. रमाकांत शुक्ला यांचे निधन

अल जझिराच्या महिला पत्रकाराचा गोळीबारात मृत्यू

कोरोना महामारीमुळे शाळा कॉलज बंद झाल्यांनतर अनेक ऑनलाईन शिक्षण संस्था तेजीत आल्या. बायजुसने लॉकडाऊन दरम्यान ७.५ दशलक्ष नवीन वापरकर्ते जोडले, या महामारीत ऑनलाईन शिक्षण स्टार्टअप्सच्या निधीतही वाढ झाली. जानेवारी २०२० ते डिसेंबर २०२१ दरम्यान, स्टार्टअप्सनी एकूण ६.१ डॉलर अब्ज निधी उभारला. मात्र पुन्हा शाळा कॉलेज सुरु झाल्याने विद्यार्थ्यांनी ऑनलाईन शिक्षणाकडे पाठ फिरवली आहे.

Exit mobile version