कांस्यपदक जिंकून मनिकाने केली सोनेरी कामगिरी

या कामगिरीने मनिका बत्रा पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.

कांस्यपदक जिंकून मनिकाने केली सोनेरी कामगिरी

टेबल टेनिस आशियाई चषक २०२२ मध्ये, मनिका बत्राने आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक जिंकून इतिहास रचला. विशेष म्हणजे, आशियाई कप टेबल टेनिसमध्ये पदक जिंकणारी मनिका बत्रा ही पहिली भारतीय महिला ठरली आहे. मनिका बत्राने कांस्यपदकाच्या सामन्यात शानदार खेळ दाखवला.

महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत जागतिक क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर असलेल्या हिना हयाताचा सामना करत, बत्राने चमकदार कामगिरी केली. बत्राने हिना हयाताचा ४-२ असा पराभव केला. या स्पर्धेची अंतिम फेरी गाठून ती सुवर्णपदकावर नाव कोरेल अशी सर्व भारतीयांची अपेक्षा होती. परंतु, उपांत्य फेरीच्या सामन्यात तिला जपानच्या मीमा इटोने पराभूत केले. मात्र, कांस्यपदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला आणि चेतन बब्बूरनंतरची दुसरी भारतीय ठरली आहे. माजी पुरुष एकेरी खेळाडू चेतन हा आशियाई चषक स्पर्धेत पदक जिंकणारा एकमेव भारतीय टेबल टेनिसपटू आहे. त्याने १९९७ मध्ये रौप्य आणि २००० मध्ये कांस्यपदक जिंकले होते. या यादीत मनिकाच्या नावाचाही समावेश झाला आहे.

विजयानंतर मनिका बत्रा हिने माध्यमांशी संवाद साधला. ती म्हणाली, आशियाई चषक स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याचा आनंद आहे. माझ्यासाठी हा मोठा विजय आहे, अव्वल खेळाडूंना पराभूत करणे आणि त्यांच्याविरुद्ध खेळणे आणि स्पर्धा करणे खूप छान होते. मी कठोर परिश्रम करत राहीन आणि माझे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करेन.

हे ही वाचा : 

वाँटेड दहशतवादी हरविंदर सिंग रिंदाचा पाकिस्तानात मृत्यू

‘पराभवाच्या भीतीने राहुल गांधी प्रचारात नाहीत’

पुण्यामध्ये ठाकरे गटाला खिंडार, एकाच वेळी ३६ राजीनामे

सजा की मजा! तिहार तुरुंगात सत्येंद्र जैन यांनी घेतला मसाजचा आनंद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मनिका बत्राचे ट्विटरद्वारे अभिनंदन केले आहे. आशियाई चषक स्पर्धेत कांस्यपदक जिंकून भारतीय टेबल टेनिसचा इतिहास लिहिल्याबद्दल मी मनिका बत्राचे अभिनंदन करतो. तिचे यश भारतातील अनेक खेळाडूंना प्रेरणा देईल आणि टेबल टेनिस आणखी लोकप्रिय करेल, असं ट्विट मोदींनी केले आहे.

Exit mobile version