टेटेपटू मनिका बात्राने केला प्रशिक्षकावर हा गंभीर आरोप!

टेटेपटू मनिका बात्राने केला प्रशिक्षकावर हा गंभीर आरोप!

टोकियो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्यावेळी मनिका बत्राने राष्ट्रीय प्रशिक्षक सौम्यदीप राय हे आपल्या वैयक्तिक सामन्याच्या वेळी सोबत नको, असे म्हटले होते. त्यावरून भारतीय टेबल टेनिस महासंघाने मनिकाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

ऑलिम्पिक पात्रता टेबल टेनिस स्पर्धेत राष्ट्रीय प्रशिक्षक सौम्यदीप राय यांनी काही सामन्यात जाणून बुजून हार पत्करण्यासाठी आग्रह धरला होता. त्यामुळेच ते मला प्रशिक्षक म्हणून नको होते, असा आरोप मनिकाने केला आहे.

मनिकाने केलेल्या या आरोपामुळे भारतीय टेनिस महासंघ आणि स्टार खेळाडूतील संघर्ष अधिकच विकोपास जाणार असल्याची शक्यता आहे. मनिकाने सौम्यदीप राय यांच्याऐवजी वैयक्तिक खासगी प्रशिक्षक सन्मय पारांजपे यांच्यासाठी आग्रह धरला होता. मात्र परांजपे हे संघासोबत व्यवस्थापक म्हणून असल्याने त्यांना प्रशिक्षक म्हणून कोर्टजवळ बसण्यास संयोजक समितीने मनाई केली होती. मनिकाने सन्मय मार्गदर्शक म्हणून नसतील तर इतर कोणीही मार्गदर्शक नको, अशी ठाम भूमिका घेतली होती.

हे ही वाचा:

गौहत्या करणाऱ्या जावेदला इलाहाबाद उच्च न्यायालयाने फटकारले

उत्तर प्रदेशात पुन्हा उमलणार कमळ, काँग्रेस गमावणार पंजाबची सत्ता

प्रवाशांना लुटणाऱ्या खासगी बस वाहतूकदारांना आवर घालणार का?

बोरिवलीत इमारतीच्या सातव्या मजल्यावर आग, जीवितहानी टळली 

मार्गदर्शकांनी लढत फिक्स करण्याचा प्रयत्न केला असून त्यासंबंधीचे पुरावे आहेत. ते पुरावे योग्य वेळी पदाधिकाऱ्यांकडे सादर करण्याची तयारी आहे. सामना मुद्दामहून हरण्यासाठी राष्ट्रीय मार्गदर्शक खोलीत आले होते आणि खोलीत ते २० मिनिटे होते. आपल्या अकादमीतील खेळाडूस संधी देण्यासाठी ते राष्ट्रीय हिताचा मुद्दा मांडत होते. त्यावेळी त्यांच्या अकादमीत शिकणारा खेळाडूही त्यांच्यासोबत होता, असे मानिका बत्रा हिने सांगितले.

संबंधित प्रकरणावर सौम्यदीप राय यांनी मौन धारण केले आहे. मनिकाने सौम्यदीप यांच्यावर आरोप केले असून सौम्यदीप यांच्याकडून त्यास उत्तर दिल्यावरच त्यावर निर्णय घेण्यात येईल, असे भारतीय टेनिस महासंघाचे सचिव बॅनर्जी यांनी स्पष्ट केले.

Exit mobile version