एकीकडे सुरू असलेले रशिया युक्रेन युद्ध आणि दुसरीकडे शमण्याची चिन्हे दिसत नसलेले इस्रायल-पॅलेस्टाईन युद्ध यामुळे जागतिक व्यापारावर जबरदस्त परिणाम झाला आहे. याचा परिणाम आता आंबा निर्यातीवरही झाला आहे. इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे समुद्रमार्गे होणारी निर्यात बंद आहे. त्यामुळे हवाई वाहतुकीवर मोठा ताण आला आहे.
इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धामुळे समुद्रमार्गे होणारी निर्यात बंद आहे. त्यामुळे सर्व प्रकारची निर्यात हवाईमार्गे सुरू आहे. परिणामी हवाई वाहतुकीवर मोठा ताण आला आहे. हवाई वाहतूक दरात सरासरी २५ टक्क्यांनी वाढ झाली. वाढीव दरानेही आंबा निर्यात करण्यासाठी निर्यातदार तयार आहेत. पण हवाई वाहतूक कंपन्यांकडून आंबा निर्यातीसाठी अपेक्षित कोटा मिळत नाही, अशी माहिती पणन मंडळातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. वाढीव दरानेही आंबा निर्यातीसाठी निर्यातदारांना कोटा मिळत नसल्यामुळे आंबा निर्यात सुमारे ५० टक्क्यांनी घटली आहे.
यंदा राज्यात आंबा उत्पादन चांगले असून निर्यातक्षम दर्जाचा हापूस मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने एकूण पाच हजार टन आंबा निर्यातीचे उद्दिष्ट ठेवले होते. पण ते लक्ष्य गाठणे कठीण होऊन बसले आहे.
आतापर्यंत सुमारे १२०० टन आंबा निर्यात होणे अपेक्षित होते. पण यंदा २३ एप्रिलअखेर वाशी येथील निर्यात सुविधा केंद्रावरून फक्त ६२५ टन आंब्याची निर्यात झाली आहे. मागील वर्षी हापूसचे उत्पादन कमी असतानाही केवळ अमेरिकेला ८५० टन आंबा निर्यात झाली होती. निर्यात सुविधा आणि आंब्याची उपलब्धता चांगली असतानाही निर्यात घटली आहे. वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीतील फळांचे व्यापारी संजय पानसरे ‘लोकसत्ता’शी बोलताना म्हणाले, यंदा अमेेरिकेतून आंब्याला मोठी मागणी आहे. पण वाहतुकीत अडचणी येत आहेत. इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धामुळे हवाई वाहतूक दरात २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. वाढीव दरानेही निर्यातदार आंबा निर्यातीस तयार आहेत. पण हवाई वाहतूक कंपन्यांकडून आंब्याला निर्यात कोटा मिळत नाही.
हे ही वाचा:
सिसोदिया तुरुंगातच राहणार, न्यायालयीन कोठडीत वाढ!
ईडी अधिकाऱ्यांवरील हल्ल्याप्रकरणी संदेशखालीत सीबीआयकडून छापेमारी
बोटाला शाई दाखवा आणि डोकं हलकं करा
‘सुळसुळीत वचननामा आणि बुळबुळीत वचने’
पणन मंडळाच्या वाशी येथील निर्यात सुविधा केंद्रावरून २३ एप्रिलपर्यंत सुमारे ६२५ टन आंब्याची निर्यात झाली आहे. ब्रिटनला ४००, अमेरिकेला २००, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडला प्रत्येकी १५ आणि जपानला तीन टन आंब्याची निर्यात झाली आहे.