इस्तंबूलमध्ये खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात मँचेस्टर सिटीने इंटर मिलानचा १-०ने पराभव करून पहिल्यांदाच ‘चॅम्पियन्स लीग’ किताबावर नाव कोरले. मँचेस्टर सिटीकडून एकमेव गोल रोड्री याने ६८व्या मिनिटांनी लगावला. सामन्याच्या पहिल्या अर्ध्या वेळेत संघाचा प्रमुख मिडफिल्डर केविन डी ब्रुइन जखमी असूनही मँचेस्टर सिटीने हा विजय प्राप्त केला.
याच विजयासोबत मँचेस्टर सिटीने युरोपीय फुटबॉलच्या शिखरावर पोहोचण्याची आपली महत्त्वाकांक्षा पूर्ण केली. मँचेस्टर सिटीने पहिल्यांदाच युरोपीय फुटबॉलमधील ही सर्वांत मोठी स्पर्धा जिंकली असताना त्यांचे प्रशिक्षक पेप गार्डियोला यांनी तिसऱ्यांदा या विजयाचा चषक उंचावला आहे.
हे ही वाचा:
ठीक वर्षापूर्वी मविआची भाकरी करपली होती, आज अजित पवारांची करपली!
शरद पवारांनी नेहमीप्रमाणे अजित पवारांना डावललं?
पंतप्रधान योजनेला बदनाम करण्यासाठी जेवणात टाकला होता साप
शरद पवारांच्या निर्णयावर काय म्हणाले अजित पवार?
मँचेस्टर सिटीने इंग्लिश फुटबॉलचे कित्येक किताब स्वत:च्या नावावर केले आहेत. मात्र चॅम्पियन्स लीगच्या चषकाने त्यांना नेहमीच हुलकावणी दिली होती. यंदा मात्र शानदार प्रदर्शन करून त्यांनी या चषकावर नाव कोरले. याआधी सन २०२१मध्ये मँचेस्टर सिटीने अंतिम सामन्यापर्यंत धडक दिली होती. मात्र तिथेही त्यांची निराशा झाली. चेल्सीने मँचेस्टर सिटीचा पराभव केला होता. चॅम्पियन्स लीगमध्ये जगभरातील सर्वोत्तम फुटबॉल क्लब खेळतात.
इंटर मिलानच्या आशा धुळीला
गेल्या १३ वर्षांपासून चॅम्पियन्स लीगचा किताब जिंकण्याचे स्वप्न यंदाही पूर्ण होऊ शकले नाही. इटलीच्या या संघाने शेवटचा किताब सन २०१०मध्ये जिंकला होता. तेव्हा त्यांनी बायर्न म्युनिक संघाला धूळ चारली होती. तिथपासून इंटर मिलान हा किताब जिंकू शकलेली नाही. इंटर मिलान संघाने यंदाच्या हंगामात चांगली कामगिरी केली असून त्यांनी दोन किताबांवर नावही कोरले आहे.
इंटर मिलान संघान कोप्पा इटालिया आणि सुपरकोप्पा इटालिया हे किताब जिंकले आहेत. तर, सिरी ए मध्ये हा संघ तिसऱ्या स्थानावर राहिला. इंटर मिलान तीनवेळा ‘चॅम्पियन्स लीग’ किताबाचा मानकरी ठरला आहे. सन १९६४मध्ये संघाने हा किताब नावावर केला होता. त्यानंतर १९६५ आणि २०१०मध्ये त्याने ही कामगिरी केली होती.