डोनाल्ड ट्रम्प यांच्या सभेच्या ठिकाणाहून AK-47 रायफल बाळगणाऱ्याला अटक

मिलवॉकी येथे झालेल्या नॅशनल रिपब्लिकन कन्व्हेंशनदरम्यान पोलिसांची कारवाई

डोनाल्ड ट्रम्प यांच्या सभेच्या ठिकाणाहून AK-47 रायफल बाळगणाऱ्याला अटक

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर भर सभेत गोळीबार झाला होता. यातून ट्रम्प हे थोडक्यात बचावले होते मात्र, त्यांच्या कानाला दुखापत झाली होती. या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली होती. अशातच आता अजूनही ट्रम्प यांच्या जीवाला धोका कायम असल्याचे समोर आले आहे. नुकतेच नॅशनल रिपब्लिकन कन्व्हेंशनदरम्यान एका संशयित व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. या व्यक्तीकडे AK-47 रायफल आढळली आहे.

अमेरिकेतील पेन्सिल्वेनिया या ठिकाणी १३ जुलै रोजी ट्रम्प यांच्यावर गोळीबार झाला होता. त्यानंतर आता मिलवॉकी येथे झालेल्या नॅशनल रिपब्लिकन कन्व्हेंशनदरम्यान एका संशयित व्यक्तीला अटक करण्यात आली. या व्यक्तीकडे AK-47 रायफल आढळली आहे. येत्या नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका असून निवडणुकीच्या प्रचारासाठी डोनाल्ड ट्रम्प हे ठिकठिकाणी फिरत आहेत. रिपब्लिकन पक्षाकडून ट्रम्प यांची अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून निवड करण्यात आली आहे.

यावेळी पोलिसांनी कार्यक्रम आयोजित केलेल्या ठिकाणावरुन एका २१ वर्षीय तरुणाला अटक केली. हा व्यक्ती या कन्व्हेंशनमध्ये सहभागी होण्यासाठी जात होता. त्यावेळी पोलिसांना संशय आल्याने त्यांनी त्याला रोखले. या तरुणाने तोंडावर मास्क लावला होता. त्यासोबतच त्याच्याकडे एक मोठी बॅगही होती. पोलिसांनी त्याची झाडाझडती घेतली असता त्याच्या बॅगेत AK-47 रायफल आणि काही गोळ्या आढळल्या.

हे ही वाचा:

ओमानच्या किनारपट्टीलगत तेलाचा टँकर उलटून १३ भारतीयांसह १६ जणांचा क्रू बेपत्ता

चंद्रभागेच्या तिरी, दुमदुमली पंढरी; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

भक्ती आणि श्रद्धेचा महाकुंभ माउलींच्या चरणी

कवी नारायण सुर्वेंच्या घरात केली चोरी पण, नंतर चोर चिठ्ठी लिहित म्हणाला सॉरी…

याशिवाय या कार्यक्रमाच्या ठिकाणी गस्त घालत असताना एक संशयित व्यक्ती पोलिसांना दिसली. यावेळी त्याच्या हातात चाकूही होता. पोलिसांनी त्या व्यक्तीला चाकू फेकण्यास सांगितले. मात्र त्या व्यक्तीने दुर्लक्ष केल्याने पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

Exit mobile version