… म्हणून त्याने मारली राज्यपालांच्या कानशिलात!

… म्हणून त्याने मारली राज्यपालांच्या कानशिलात!

Business concept illustration of businessman giving a speech on stage. Audience, seminar, conference theme

इराणमध्ये एका कार्यक्रमादरम्यान राज्यपाल भाषण करत असताना मंचावरचं एका व्यक्तीने त्यांना कानशिलात लगावली आहे. अचानक घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे उपस्थित लोकही चकित झाले आणि त्यांना सुरुवातीला हा प्रकार काय आहे हेच समजले नाही. नंतर चौकशीत यासंबंधीची माहिती समोर आली आहे.

‘द गार्जियन’च्या वृत्तानुसार, ब्रिगेडियर आबेदीन खोर्रम यांना काही दिवसांपूर्वीच इराणच्या पूर्व अझरबैजान प्रांताचे राज्यपाल बनवण्यात आले. एका कार्यक्रमात राज्यपाल भाषण देत असताना एका व्यक्तीने मंचावर जाऊन त्यांच्या जोरदार कानशिलात लगावली. त्याचा आवाज माईकमधून उपस्थितांनाही ऐकू गेला. राज्यपालांवर हल्ला होताच सुरक्षारक्षक तत्काळ मंचावर पोहचले आणि त्यांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेऊन बाहेर गेले. त्यानंतर राज्यपालांनी त्यांचे भाषण पूर्ण केले.

पोलिसांच्या चौकशीदरम्यान हल्लेखोराने सांगितले की, एका पुरुषाने पत्नीला कोरोनाची लस दिली होती. त्यावेळी त्याने पत्नीला स्पर्श केला. याचा त्याला भयंकर राग आला आणि सरकारचा प्रमुख म्हणून राज्यपालांना चापट मारल्याचे त्यानी सांगितले.

हे ही वाचा:

‘समीर वानखेडे मागासवर्गीय असल्यानेच त्यांना टार्गेट केलं जातंय’

‘महाविकास आघाडी सरकारच आऊटसोर्स करण्याची आली वेळ’

भारतीय संघाला बाबर घाबरला का?

समीर वानखेडेंना ८ कोटी देण्यात येणार होते… क्रूझ प्रकरणातील पंच साईलचा दावा

‘मी त्या व्यक्तीला ओळखत नाही. जेव्हा मी सिरीयात होतो तेव्हा माझे शत्रू मला दिवसातून १०- १० वेळा मारहाण करायचे. ते माझ्या डोक्यावर बंदूक धरायचे, तरीही मी त्यांना क्षमा केली. त्यामुळे ज्या व्यक्तीने मला चापट मारली त्यालाही मी क्षमा करत आहे,’ असे राज्यपालांनी सांगितले.

Exit mobile version