ममता बॅनर्जी यांचा ‘या’ मुद्द्यावरून केंद्रातील मोदी सरकारला पाठींबा!

स्पष्ट केली भूमिका

ममता बॅनर्जी यांचा ‘या’ मुद्द्यावरून केंद्रातील मोदी सरकारला पाठींबा!

बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात निदर्शने करणारे प्रमुख साधू आणि कृष्णा चेतना आंतरराष्ट्रीय सोसायटीचे चिन्मय प्रभू यांना अटक झाल्यानंतर खळबळ उडाली होती. भारतानेही याबाबत निषेध व्यक्त केला होता. त्यांच्या अटकेनंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही या मुद्द्यासंदर्भात त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. गुरुवारी त्यांनी सांगितले की, त्यांचे सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या पाठीशी चिन्मय प्रभू यांच्या अटकेविरोधातील भुमिकेच्या बाजूने उभे आहे.

ममता यांनी या मुद्द्यावर पश्चिम बंगाल सरकारची केंद्राशी पूर्ण एकता व्यक्त केली आहे. शेजारील देशातील धार्मिक अल्पसंख्याकांच्या सुरक्षेबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. ममता बॅनर्जी यांनी म्हटले की, आपण बंगालमध्ये इस्कॉनशी बोललो परंतु ही बाब त्यांच्या अधिकारक्षेत्रात येत नाही. विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, “कोणत्याही धर्माचे नुकसान होऊ नये, अशी आमची इच्छा आहे. मी येथे इस्कॉनशी बोलले आहे, पण ही बाब दुसऱ्या देशाची आहे आणि केंद्र सरकारने यावर कारवाई करावी, अशी आमची भूमिका आहे.”

याव्यतिरिक्त, काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी देखील भारताच्या शेजारी असलेल्या बांगलादेशमधील सद्य परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली. एएनआयशी बोलताना थरूर म्हणाले की, “हे खूप गंभीर आणि त्रासदायक वाटत आहे. संपूर्ण भारतीय लोक चिंतित आहेत कारण हा शेजारी देश आहे. आम्हाला काळजी आहे. केवळ परराष्ट्र मंत्रालयच लक्ष ठेवत नाही. तर, परिस्थिती घेऊन समोर येत असलेल्या अहवालांमुळे सर्व भारतातील नागरिक चिंतेत आहेत.”

हे ही वाचा : 

भारतीय तपास यंत्रणांना मोठे यश, मोस्ट वॉन्टेड दहशतवादी रवांडातून भारतात आणला!

एक दिवस असा येईल की, उद्धव ठाकरे देश सोडून जातील

संभलमध्ये हिंसाचारादरम्यान अचानक मोठ्या संख्येने लोक शस्त्रे घेऊन कसे पोहचले?

आम्हाला संसद चालवायची आहे

चिन्मय प्रभू यांनी शुक्रवार, २२ नोव्हेंबर रोजी बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ रंगपूर येथे मोठ्या निषेध रॅलीला संबोधित केले होते. बांगलादेशातील पुंडरिक धामचे अध्यक्ष चिन्मय कृष्ण दास ब्रह्मचारी हे बांगलादेशात भगवा ध्वज फडकावल्याबद्दल देशद्रोहाचा आरोप असलेल्या १८ जणांपैकी एक होते. चिन्मय प्रभू यांना ढाका पोलिसांच्या डिटेक्टीव्ह ब्रँचने सोमवारी (२५ नोव्हेंबर) ढाका विमानतळावर अटक केली.

Exit mobile version