बांगलादेशातील अल्पसंख्याकांवरील हिंसाचाराच्या विरोधात भारतात ठिकठीकाणी निदर्शने होत असून बांगलादेशच्या मुद्द्यावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही मोठे वक्तव्य केले आहे. ममता बॅनर्जी विधानसभेत सोमवार, ९ डिसेंबर रोजी म्हणाल्या की, “काही लोक म्हणत आहेत की, ते बिहार, कोलकाता, ओडिशा काबीज करतील. पण, त्यांना सांगायचे आहे की तुम्ही नीट राहा, निरोगी राहा आणि सुंदर राहा. फक्त तुम्हीच नाही तर इतर कोणीही. इतकी हिम्मत करू शकत नाही की ते बंगाल, बिहार आणि ओडिशा काबीज करतील आणि आम्ही फक्त बसून लॉलीपॉप खाऊ, असा विचार करण्याची गरज नाही.”
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशमधील परिस्थितीवर परखड मत मांडले आहे. बांगलादेशमधून आलेल्या विधानावर त्यांनी आता बांगलादेशला सुनावले असून त्यांना इशारा दिला आहे. जर तुम्ही आमचा प्रदेश ताब्यात घेण्याचा प्रयत्न केलात तर आम्ही शांत बसून लॉलीपॉप खात राहू का? त्यांनी पश्चिम बंगाल विधानसभेत बांगलादेशींना फटकारले आणि बांगलादेशात जे काही चालले आहे ते योग्य नाही, असे खडे बोल सुनावले. अल्पसंख्याकांवर होत असलेल्या अत्याचारावर त्यांनी गंभीर चिंता व्यक्त केली.
हे ही वाचा :
१०३ शेतकऱ्यांचं जगणं धोक्यात आलं… राज ठाकरे वक्फ बोर्डाविरोधात
लोकसभेतं मविआला ईव्हीएम गारगार वाटलं आणि आता गरम वाटतंय!
‘अमृत’च्या सल्लागार पदी विश्वजीत देशपांडे यांची नियुक्ती
न्यायप्रिय, संयमी व्यक्तिमत्व विधानसभेच्या अध्यक्षपदी लाभल्याचा आनंद
ममता बॅनर्जी विधानसभेत म्हणाल्या, “कोणी कोलकाता काबीज करण्याबद्दल बोलले. काहींनी पुन्हा पश्चिम बंगाल, बिहार आणि ओडिशा परत करण्याची मागणी करण्याची धमकी दिली आहे. जर कोणी कोलकाता किंवा बंगाल काबीज करायला आले तर, राज्य सरकार गप्प बसून राहणार नाही. भारत अविभाज्य आहे,” असं ममता म्हणाल्या. बांगलादेशी लष्कराचा माजी सदस्य असल्याचा दावा करणाऱ्या एका व्यक्तीने चेतावणी दिली की त्यांचे कौशल्य भारतीय लष्करापेक्षा चांगले आहे आणि ते चार दिवसांत कोलकाता काबीज करू शकतील, यावरून ममता यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे.