बांगलादेश पीडितांसाठी ठोस पावले उचला, ममतांचे मोदींना आवाहन

मोदी सरकारला संयुक्त राष्ट्र संघाने हस्तक्षेप करण्यासाठी पुढाकार घेण्याची विनंती

बांगलादेश पीडितांसाठी ठोस पावले उचला, ममतांचे मोदींना आवाहन

बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचारादरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे महत्त्वाची मागणी केली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवार, २ डिसेंबर रोजी बांगलादेशातील सध्याच्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. ममता यांनी मोदी सरकारला संयुक्त राष्ट्र संघाने हस्तक्षेप करण्यासाठी पुढाकार घेण्याची विनंती केली. परिस्थिती सामान्य करण्यासाठी त्यांनी आंतरराष्ट्रीय शांतता सेना तैनात करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. यासोबतच बांगलादेशातील पीडित भारतीयांच्या सुटकेसाठी आणि पुनर्वसनासाठी ठोस पावले उचलण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले आहे.

शेजारील देशात अल्पसंख्याकांवर होणारे अत्याचार थांबावेत यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः हस्तक्षेप करावा, असेही त्या म्हणाल्या. इस्कॉनच्या तीन हिंदू पुजाऱ्यांना अटक केल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जीची मागणी समोर आली आहे. पश्चिम बंगाल विधानसभेत भाषण करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, आमचे कुटुंब, मालमत्ता आणि प्रियजन बांगलादेशमध्ये आहेत. या प्रकरणी सरकार जे काही पाऊल उचलेल ते आम्हाला मान्य असेल. त्या म्हणाल्या की, धर्माच्या आधारे होणाऱ्या अत्याचाराचा आम्ही जगात कुठेही निषेध करू.

ममता बॅनर्जी असेही म्हणाल्या की, मी इस्कॉन कोलकाता प्रमुखांशी बोलली आहे. आमची सहानुभूती आणि पाठिंबा त्यांच्या पाठीशी आहे. बांगलादेशात भारतीयांवर हल्ले झाले तर ते आम्ही अजिबात सहन करणार नाही, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. भारत सरकार हे प्रकरण संयुक्त राष्ट्रात घेऊन जाऊ शकते, असे त्या म्हणाल्या. ममता बॅनर्जी म्हणाल्या की, मी कोणाच्याही अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करण्याबाबत बोलत नाही. पण जेव्हा जेव्हा बांगलादेशी मच्छिमार सीमेवर पकडला जातो किंवा बांगलादेशी प्रवासी अडचणीत असतो तेव्हा आमचे सरकार त्यांना मदत करते. त्यांच्यावर उपचार करते.

हे ही वाचा..

संसदेच्या दोन्ही सभागृहात संविधानावर चर्चा होणार

‘उपमुख्यमंत्रीपदाच्या बातम्या अफवा, हा तर प्रसारमाध्यमांचा उत्साह !’

जामीन मंजूर होताच दुसऱ्याचं दिवशी मंत्री, हे सगळं काय चाललंय? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

पहिलीच पोस्टिंग स्वीकारण्यासाठी निघालेल्या आयपीएस अधिकाऱ्याचा अपघातात मृत्यू

दरम्यान, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी गेल्या आठवड्यात या संदर्भात पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती. यानंतर परराष्ट्रमंत्र्यांनी बांगलादेशच्या अंतरिम सरकारशी चर्चा केली. यादरम्यान परराष्ट्रमंत्र्यांनी बांगलादेशातील हिंदूंवरील वाढत्या हिंसाचाराबद्दल चिंता व्यक्त केली होती. पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनीही या प्रकरणाची माहिती संसदेत दिली होती. बांगलादेशातील हिंदूंवरील हिंसाचाराबाबत सरकार कठोर असल्याचे ते म्हणाले होते.

Exit mobile version