26 C
Mumbai
Tuesday, December 17, 2024
घरदेश दुनियाजीवनावश्यक वस्तूंची मालामालगाडी

जीवनावश्यक वस्तूंची मालामालगाडी

Google News Follow

Related

कोरोना काळात अनेक रेल्वे बंद असल्यामुळे उत्पन्नावर फारच परिणाम झाला. परंतु जीवनावश्यक सुविधांसाठी मालगाडी रुळावर असल्याकारणाने, मालगाडीच्या उत्पन्नामुळेच सध्याच्या घडीला रेल्वेसेवा रुळावर आहे. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कायम ठेवण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या वस्तू आणि पार्सल विशेष गाड्या देशभरात सतत धावत आहेत. यात पश्चिम रेल्वेने १ एप्रिल २०२१ ते १५ ऑगस्ट २०२१ पर्यंत देशाच्या विविध भागांमध्ये आवश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी २७१ पार्सल गाड्या चालवल्या आहेत.

या कालावधीत ३१.१३ दशलक्ष टन मालवाहतूक गाड्यांची नोंदणी करण्यात आली, जी मागील वर्षाच्या याच कालावधीत २४.७० दशलक्ष टन होती. विभागीय व्यवसाय विकास युनिट्स (बीडीयू) पश्चिम रेल्वेचे सरव्यवस्थापक आलोक कंसल यांच्या मार्गदर्शनाखाली बारकाईने निरीक्षण केले जात आहे, ज्यामुळे पार्सल वाहतुकीत सुधारणा झाली आहेच, परंतु नवीन वाहतुकीच्या दृष्टीने मालवाहतुकीच्या चांगल्या वाहतुकीच्या संधीही निर्माण झाल्या आहेत.

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांच्या म्हणण्यानुसार, १ एप्रिल २०२१ ते १५ ऑगस्ट २०२१ पर्यंत पश्चिम रेल्वेने १ लाख टन पेक्षा जास्त वजनाच्या वस्तूंची विविध पार्सल विशेष गाड्यांमधून वाहतूक केली आहे, ज्यात कृषी उत्पादने, औषधे, वैद्यकीय उपकरणे, मासे, दूध यांचा समावेश आहे. यामधून मिळणारा महसूल सुमारे ३५.५० कोटी रुपये आहे. ४७ हजार टनांपेक्षा जास्त दुधाची वाहतूक करण्यासाठी पश्चिम रेल्वेकडून ६८ दुधाच्या विशेष गाड्या चालवण्यात आल्या आणि वॅगनचा १००% वापर करण्यात आला. त्याचप्रमाणे, ८२ कोविड -१९ विशेष पार्सल ट्रेन चालवण्यात आल्या आणि १४ हजार टन जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करण्यात आलेली आहे.

हे ही वाचा:

आता या माध्यमातून अमेरिकेची तालिबानवर कारवाई?

लसीचा एक डोस घेतलात तरी तुम्ही सुरक्षित

अफगाणिस्तानच्या खासदाराला आला मेसेज आणि झाले दुःख अनावर…

अश्रफ घनी यांच्यानंतर ‘या’ महत्वाच्या व्यक्तीनेही देश सोडला

याव्यतिरिक्त, २४ हजार टन भार असलेले ४९ इंडेंट रेक देखील १००% वापरासह चालवले गेले. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी आणि किफायतशीर आणि जलद वाहतुकीसाठी नवीन बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी, सुमारे १८ हजार टन भार असलेल्या ७२ किसान रेल या कालावधीत विविध विभागांमधून चालवण्यात आल्या. ३१.१३ दशलक्ष टन जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करण्यासाठी १ एप्रिल २०२१ ते १५ ऑगस्ट २०२१ या कालावधीत मालगाड्यांच्या एकूण १४२८९ रेक चालवण्यात आल्या. २९ हजार ८९६ मालवाहतूक गाड्या इतर परिमंडलीय रेल्वेसह बदलल्या गेल्या. १४ हजार ९६६ गाड्या हस्तांतरित केल्या आणि १४ हजार ९३० गाड्या वेगवेगळ्या इंटरचेंज पॉईंट्सवर ताब्यात घेतल्या.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
214,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा