23 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरदेश दुनियामालदीवमध्ये भारत विरोधी घोषणा दिल्यास होणार ही शिक्षा

मालदीवमध्ये भारत विरोधी घोषणा दिल्यास होणार ही शिक्षा

Google News Follow

Related

भारत आणि मालदीवमध्ये नेहमीच चांगले संबंध राहिले आहेत, परंतु गेल्या काही वर्षांत चीनच्या वाढत्या कारवायांमुळे मालदीवमधील परिस्थिती भारतविरोधी होत होती. मात्र, आता सत्ताधारी मालदीवियन डेमोक्रॅटिक पार्टीने (एमडीपी) अशी निदर्शने रोखण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे.

मालदीवचे माजी चीन समर्थक राष्ट्राध्यक्ष अब्दुल्ला यामीन यांनी भारताविरुद्ध चालवलेल्या ‘इंडिया आउट’ मोहिमेला बेकायदेशीर घोषित करण्यासाठी मालदीव सरकार नवीन विधेयक घेऊन येत आहे. नवीन विधेयकानुसार, भारतविरोधी घोषणा देणाऱ्यांकडून २० हजार मालदीवियन रुफियाचा दंड आकारला जाईल. यासोबतच त्याला सहा महिने किंवा एक वर्षाची शिक्षा होऊ शकते. मालदीवमधील पत्रकार अहमद अजान यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.

‘मालदीव सरकारने इंडिया आउट स्लोगनचा वापर गुन्हा म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे. सत्ताधारी पक्षाने तयार केलेल्या विधेयकानुसार या मोहिमेत सहभागी होणाऱ्यांना सहा महिन्यांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो,’ असे ट्विटमध्ये म्हटले आहे.

हे ही वाचा:

क्रिप्टोकरन्सीसाठी पोलिसानेच केले व्यापाऱ्याचे अपहरण

राज्यातील निर्बंध शिथिल; काय आहे नवी नियमावली?

Budget 2022 : काय स्वस्त काय महाग?

Budget 2022: विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी २०० चॅनेल्सची घोषणा

तुरुंगातून सुटल्यानंतर अब्दुल्ला यामीनच्या ‘इंडिया आऊट’ मोहिमेला आणखी वेग आला आहे. मालदीवचे लोक तेथे उपस्थित असलेले भारतीय सैनिक आणि उपकरणे त्यांच्या देशातून काढून टाकण्यासाठी आंदोलन करत आहेत. त्याची सुरुवात २०१८ मध्ये झाली होती. २०१२ मध्ये असाच विरोध करण्यात आला होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा