मालदीवचे माजी राष्ट्रपती अब्दुल्ला यामीन यांना हवाला आणि लाचखोरी प्रकरणात स्थानिक न्यायालयाने ५० लाख डॉलरच्या दंडासह ११ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. फौजदारी न्यायालयाने यामीनला सरकारी बेटाच्या लीजच्या बदल्यात पैसे स्वीकारल्याबद्दल दोषी ठरवले आहे . यामीन २०१३ ते २०१८ या कालावधीत हिंद महासागरातील बेट देश आणि पर्यटन स्थळाचे प्रमुख होते. त्यांना हवाला प्रकरणी सात वर्षे आणि लाच घेतल्याप्रकरणी चार वर्षांची शिक्षा झाली आहे.
सरकारच्या मालकीच्या एका बेटाच्या लीजच्या बदल्यात लाच घेतल्याप्रकरणी न्यायालयाने यामीनला दोषी ठरवले आहे . यामीन २०१३ ते २०१८ पर्यंत मालदीवचे अध्यक्ष होते. २०१८ च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. २०२३ मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी यामीन यांना मालदीवच्या प्रोग्रेसिव्ह पार्टीचे अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे.
यामिन यांना २०१९ मध्ये आणखी एका प्रकरणात त्याला हवालासाठी पाच वर्षांची शिक्षा झाली होती
२०१९ मध्ये त्यांना पूर्वीच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती आणि २०१९ मध्ये १०लाख डॉलर सरकारी निधीची उधळपट्टी केल्याबद्दल पाच लाख दंड ठोठावण्यात आला होता. यामीन यांना दोषी ठरवल्यानंतर २०२० मध्ये नजरकैदेत ठेवण्यात आले आणि काही महिन्यांनंतर त्यांची सुटका करण्यात आली. २०१८ च्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलिह यांनी यामीन यांचा पराभव केला होता. त्यांच्या कार्यकाळात यामीन यांच्यावर भ्रष्टाचाराचे, माध्यमांना दडपण्याचे आणि त्यांच्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांचा छळ करण्याचे आरोप होते.