मालदीवचे माजी राष्ट्रपती नशीद यांनी भारताची मागितली माफी

भारत मालदीव संबंधांमध्ये तणावाचा विपरित परिणाम होत असल्याचे केले विधान

मालदीवचे माजी राष्ट्रपती नशीद यांनी भारताची मागितली माफी

मालदीवचे माजी राष्ट्रपती मोहम्मद नशीद यांनी भारताने केलेल्या बहिष्काराच्या आवाहनावर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी मालदीवच्या नागरिकांच्या वतीने भारताची माफी मागत भारतीय पर्यटकांनी येथे येणे कायम ठेवावे, असे आवाहन केले. सध्या नशीद हे भारतदौऱ्यावर आहेत.

भारतीय पर्यटकांनी मालदीववर टाकलेल्या बहिष्काराबाबत नशीद यांना विचारण्यात आले असता, याचा विपरित परिणाम झाल्याचे त्यांनी सांगितले. ‘मी सध्या भारतात आहे आणि याबाबत खूप चिंतेत आहे. मालदीवचे नागरिक तुमची क्षमा मागत आहेत. जे काही झाले, त्याचा आम्हाला खेद वाटतो. भारतातील पर्यटकांनी त्यांच्या सुट्ट्या व्यतीत करण्यासाठी मालदीवला यावे, असे आम्हाला वाटते. तिथे त्यांच्या स्वागत-सत्कारात कसलीही कसर बाकी राहणार नाही,’ असे नशीद म्हणाले.

हे ही वाचा:

पाचव्या कसोटीत टीम इंडिया मजबूत स्थितीत

रोहित पवारांना ईडीचा झटका, बारामती अ‍ॅग्रो संबंधित कारखान्याची मालमत्ता जप्त!

राहुल गांधी पुन्हा वायनाडमधूनच लढणार

१० बस बदलल्या, वेगवेगळे कपडे घातले.. बेंगळुरू कॅफे बॉम्बस्फोट संशयितांची माहिती समोर!

तसेच, ज्या नेत्यांमुळे भारत व मालदीव या दोन देशांचे संबंध बिघडले, त्या नेत्यांवर त्वरित कारवाई केल्याबद्दल नशीद यांनी विद्यमान राष्ट्रपतींचे कौतुकही केले. दोन्ही देशांमधील नाते पुन्हा पूर्वपदावर आले पाहिजे, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. तसेच, दोन्ही देशांमध्ये वाद सुरू असताना भारताच्या जबाबदार वर्तनाचेही त्यांनी कौतुक केले. ‘जेव्हा मालदीवच्या राष्ट्रपतींनी अशी इच्छा व्यक्त केली की, भारतीय सैनिकांनी मायदेशी परतावे. तेव्हा माहितीये भारताने काय केले? त्यांनी त्यांची ताकद दाखवली नाही. मालदीव सरकारला केवळ इतकेच सांगितले की, ठीक आहे. आपण त्यावर चर्चा करू.’ याची आठवण त्यांनी करून दिली.

डोर्नियर विमाने आणि हेलिकॉप्टरबाबतही त्यांनी मत मांडले. ही विमाने आणि हेलिकॉप्टरना वैद्यकीय मदतीसाठी मालदीवला आणण्यात आले होते. याबाबत आता आणखी वाद वाढवू नका, असे आवाहन मी विद्यमान राष्ट्रपीत मोइझ्झूंना करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Exit mobile version