भारताने विमाने दिली, पण मालदीवकडे वैमानिकच नाहीत!

भारताने विमाने दिली, पण मालदीवकडे वैमानिकच नाहीत!

भारताशी संबंध बिघडवल्यामुळे मालदीवची डोकेदुखी वाढू लागली आहे. भारताकडून दान मिळालेली तीन विमाने चालवण्यासाठी आमच्याकडे एकही वैमानिक सक्षम नाही, अशी कबुली मालदीवचे संरक्षण मंत्री घासन मौसून यांनी दिली आहे.

मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइझ्झू यांच्या सांगण्यावरून भारताने काही दिवसांपूर्वी आपल्या ७६ सैनिकांना परत बोलावले होते. आता या जवानांची जागा हिंदुस्तान ऍरोनॉटिक्स लिमिटेडच्या कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. घासन यांनी शनिवारी राष्ट्रपती भवनाच्या कार्यालयात एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मालदीवमधील दोन हेलिकॉप्टर आणि एक डॉर्नियर विमान उडवणाऱ्या भारतीय सैनिकांना माघारी बोलावणे आणि त्यांच्या जागी भारताकडून सर्वसामान्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याबाबत माहिती दिली.

‘मालदीव राष्ट्रीय संरक्षण दलात असा कोणीही सैनिक नाही, जो भारतीय लष्कराने दान केलेल्या तीन विमानांचे संचलन करू शकेल, असे त्यांनी सांगितले. काही सैनिकांनी उभय देशांमध्ये झालेल्या करारानुसार त्यांना विमान उड्डाणाचे प्रशिक्षण दिले होते. मात्र ते विविध टप्प्यांतील प्रशिक्षण होते. आमचे सैनिक विविध कारणांमुळे हे टप्पे पूर्ण करू शकले नाहीत. त्यामुळे सद्य परिस्थितीत आमच्या संरक्षण दलाकडे दोन हेलिकॉप्टर आणि डॉर्नियर विमाने उडवण्याचा परवाना असणारा एकही सक्षम व्यक्ती नाही, असे त्यांनी एका पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

हे ही वाचा:

‘तुम्ही ‘आप’ला मत दिल्यास मला पुन्हा तुरुंगात जावे लागणार नाही’

‘पेज थ्री संस्कृतीवर महाराष्ट्र चालवता येत नाही’

प्रशासनाच्या आदेशानंतरही गुजरातमधील जामनगरच्या रणजितसागर धरणावरील बेकायदा दर्गा ‘जैसे थे’

शादाब, शोएबकडून अल्पवयीन दलित मुलीचा विनयभंग!

चीनसमर्थक नेता मुइझ्झू यांनी १० मेपर्यंत सर्व भारतीय जवानांना परत बोलावण्याच्या सूचना केल्या आहेत. हे जवान या विमानांचे संचलन करण्यासाठी तेथे तैनात होते. भारताने आधीच ७६ जवानांना माघारी बोलावले आहे. मुइझ्झू यांनी हे पाऊल उचलल्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढला होता.

Exit mobile version