मुइज्जूनी गुडघे टेकले; आर्थिक चणचणीमुळे मालदीवने भारतासमोर पसरले हात

चीनसमर्थक मुइज्जू यांनी भारताच्या प्रति कठोर भूमिका घेतली होती

मुइज्जूनी गुडघे टेकले; आर्थिक चणचणीमुळे मालदीवने भारतासमोर पसरले हात

आर्थिक चणचण जाणवू लागल्यामुळे मालदीवचे पंतप्रधान मोहम्मद मुइज्जू आता नरमले आहेत. मालदीवच्या विकासकामांसाठी निकटचे सहकारी भारताकडून त्यांना खूप अपेक्षा आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. काही दिवसांपूर्वीच मुइज्जू यांनी मालदीवमधून भारतीय लष्कराला हटवण्यावर जोर दिला होता.

‘भारत हा मालदीवचा जवळचा सहकारी आहे आणि आम्ही आशा करतो की, हा शेजारी देश आम्हाला कर्जामध्ये दिलासा देईल,’ असे मुइज्जू यांनी म्हटले आहे. सन २०२३पर्यंत मालदीववर भारताचे सुमारे ४० कोटी डॉलरचे कर्ज आहे. नोव्हेंबर, २०२३मध्ये राष्ट्रपतिपदाची शपथ घेतल्यानंतर चीनसमर्थक मुइज्जू यांनी भारताच्या प्रति कठोर भूमिका घेतली होती. तसेच, १०मेपर्यंत भारतीय लष्कराने मालदीवमधून काढता पाय घ्यावा, असे निर्देशही दिले होते.

हे ही वाचा:

भारत- भूतानमध्ये व्यापार, डिजिटल कनेक्टिव्हिटी, अंतराळ क्षेत्रातले सामंजस्य करार

दिवाळे गावातील मच्छिमार बांधवांना नुकसान भरपाई द्या

उत्तर प्रदेशात काँग्रेसच्या अस्तित्वावर संकट

कर्णधार ऋतुराजची विजयी सलामी

‘भारत हा मालदीवचा सर्वांत जवळचा सहकारी’

आता मुइज्जू यांचे म्हणणे आहे की, भारत मालदीवचा सर्वांत जवळचा सहकारी म्हणून कायम राहील. मालदीवने भारताकडून कर्ज घेतले आहे. हे कर्ज फिटण्यासाठी विविध पर्याय चाचपडून पाहिले जात असून ते सातत्याने भारताशी याबाबत चर्चा करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. भारत याबाबत सहकार्य करेल, असा विश्वास मुइज्जू यांनी व्यक्त केला आहे.

पंतप्रधान मोदींसह चर्चेचा उल्लेख

मुइज्जू यांनी डिसेंबर २०२३मध्ये दुबईतील शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या चर्चेला उल्लेख केला. तेव्हा माझा हेतू हा देशात सुरू असलेल्या कोणत्या योजना थांबवण्याचा नाही. तर, त्या अधिक मजबूत करण्याचा व वेगवान करण्याचा असल्याचे आपण पंतप्रधान मोदी यांना सांगितल्याची आठवण त्यांनी करून दिली. तसेच, दोन्ही देशांमध्ये संबंध बिघडतील, असे कोणतेही वादग्रस्त विधान आपण केले नसल्याचेही त्यांनी सांगितले.

Exit mobile version