इस्रायलमध्ये धार्मिक उत्सवात मोठी दुर्घटना

इस्रायलमध्ये धार्मिक उत्सवात मोठी दुर्घटना

Medics and rescue workers attend to the Lag B'Omer event in Mount Meron, northern Israel, where fatalities were reported among the thousands of ultra-Orthodox Jews gathered at the tomb of a 2nd-century sage for annual commemorations that include all-night prayer and dance, at Mount Meron, Israel April 30, 2021. REUTERS/ David Cohen-JINIPIX/ ATTENTION EDITORS - ISRAEL OUT. NO COMMERCIAL OR EDITORIAL SALES IN ISRAEL

कोरोनामुक्त झाल्यानंतर इस्रायलमध्ये निर्बंध शिथिल करण्यात आले आणि शुक्रवारी बॉनफायर या धार्मिक उत्सावाचं आयोजन करण्यात आलं. या उत्सवाच्या दरम्यान हजारोंची गर्दी जमली आणि चेंगराचेंगरीची दुर्दैवी घटना घडली. या चेंगराचेगंरीत आतापर्यंत ३० नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे तर हजारो नागरिक जखमी झाले आहेत.

माऊंट मेरॉन या ठिकाणी बॉनफायर उत्सव दरवर्षी भरवण्यात येतो. यासाठी हजारोंच्या संख्येने नागरिक जमा होतात. या दरम्यान नाच गाण्याचे कार्यक्रम होतात. गेल्या वर्षी कोरोनामुळे हा उत्सव होऊ शकला नव्हता. त्यामुळे या वर्षीच्या उत्सवात भाग घेण्यासाठी नागरिकांमध्ये मोठा उत्साह दिसत होता. हजारो लोक यासाठी उपस्थित राहिले. ही गर्दी प्रशासनाला आटोक्यात आणता आली नाही आणि त्याचं रुपांतर चेंगराचेंगरीत झालं. या चेंगराचेंगरीमुळे ३० नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

अनेक नागरिक जखमी अवस्थेत आहेत. त्यांना हेलिकॉप्टरच्या सहाय्याने हॉस्पिटलमध्ये हलवलं जात आहे. या कार्यक्रमाच्या आयोजकांनी सांगितलं आहे की, दहा हजार नागरिकांना या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याची परवानगी असताना प्रत्यक्षात तीस हजार नागरिकांनी उपस्थिती लावली. त्यामुळे या छोट्या जागेत प्रमाणापेक्षा जास्त गर्दी झाली आणि त्याचं रुपांतर या घटनेत झालं. इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी ही घटना दुर्दैवी असल्याचं सांगत दु:ख व्यक्त केलं आहे.

हे ही वाचा:

रेमडेसिवीरच्या बाटल्यांमध्ये सलाईनचं पाणी, बीडमधील धक्कादायक प्रकार

पुणे कोविड वाॅर रूमची विशेष व्हाॅट्सॲप सुविधा

गरोदर महिलांसाठी महिला आयोगाची विशेष सेवा

बंगालमध्ये भाजपा-तृणमूलमध्ये जोरदार रस्सीखेच

इस्रायल हा जगातील पहिलाच देश आहे जो कोरोनामुक्त झाला आहे. इस्त्रायलमध्ये सर्वाधिक प्रमाणात लसीकरण झालेलं आहे. त्यामुळे त्या देशात बरेच निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्या देशातील अनेक नागरिकांनी गेल्या काही दिवसांपासून मास्कचा वापरही बंद केला आहे.

Exit mobile version