इस्रायलची राजधानी जेरुसलेमच्या बाहेरील नेवे याकोव्ह स्ट्रीटवरील प्रार्थनास्थळावर गोळीबार झाल्याचे वृत्त आहे. या दुर्घटनेत ८ जणांचा मृत्यू झाला असून सुमारे १० जण जखमी झाले आहेत. इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. अधिकृत निवेदनानुसार ही घटना शुक्रवारी रात्री ८. १५ वाजता घडली. हा गोळीबार ‘दहशतवादी हल्ला’ असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पूर्व जेरुसलेमच्या उत्तर भागात हा गोळीबार झाल्याचे त्यांनी सांगितले.
हा दहशतवादी पूर्व जेरुसलेमच्या उत्तरेकडील भागात प्रार्थनास्थळ म्हणून वापरल्या जाणाऱ्या इमारतीत घुसला आणि गोळीबार केला. पोलिसांनी बंदूकधाऱ्याला शोधून त्याला गोळ्या घातल्या. हल्ल्यात वापरलेले पिस्तूल जप्त करण्यात आले आहे . मॅगेन डेव्हिड अॅडॉम (एमडीए) बचाव सेवेने सांगितले की त्यांच्या डॉक्टरांनी पाच बळींना घटनास्थळी मृत घोषित केले. या गोळीबारात ७० वर्षीय महिला आणि २० वर्षीय पुरुषाची प्रकृती गंभीर आहे.
हे ही वाचा:
इंडिया टुडे सीव्होटरच्या सर्वेक्षणात मोदी सर्वोत्तम; लोकसभेसाठी महाराष्ट्रात मविआला थेट ३४ जागा
अदाणींचा गेम कोण करतोय? कही पे निगाहे, कही पे निशाना…
सुरक्षा नसल्याचे कारण देत बनिहालमध्ये भारत जोडो यात्रा थांबवली
पंतप्रधानांनी परीक्षांसंदर्भात मुलांशी सुसंवाद साधला ही अभिमानाची गोष्ट!
व्हाईट हाऊसने प्रार्थनास्थळावरील दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. व्हाईट हाऊसने म्हटले आहे की, या जीवितहानीमुळे अमेरिका हादरली आहे आणि दुःखी आहे. एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना, व्हाईट हाऊसचे प्रेस सेक्रेटरी कॅरेन जीन पियरे यांनी बंदुकधारी हल्ल्याला “घृणास्पद” म्हटले. ते म्हणाले, “शुक्रवारी संध्याकाळी जेरुसलेममधील प्रार्थनास्थळावर झालेल्या घृणास्पद दहशतवादी हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि आठ निष्पाप बळींच्या हत्येसह झालेल्या जीवितहानीमुळे आम्हाला धक्का बसला आहे,” असे ते म्हणाले. जीन-पियरे म्हणाले की अमेरिका इस्रायलच्या सरकारला आणि लोकांना पूर्ण पाठिंबा असेल.