पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या तमिळनाडू भेटीत भारतीय सैन्याला अर्जुन रणगाडा अर्पित केला. नरेंद्र मोदी यांची तमिळनाडू भेट तेथील लवकरच होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकींच्या संदर्भात होती.
हे ही वाचा:
या भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक विकासकामांचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी मेन बॅटल टँक अर्जुन एमके-१ए या रणगाड्याचे देखील हस्तांतरण केले.
यावेळी मोदींनी सांगितले की आज मला देशांच्या सीमांचे संरक्षण करण्यासाठी आणखी एक लढवय्या देशाला अर्पित करताना आनंद होतो आहे. मला अभिमान आहे, की मेन बॅटल टँक अर्जुन मार्क १ए हा रणगाडा संपूर्ण भारतीय बनावटीचा आहे. त्यावर लावण्यात आलेली हत्यारे देखील भारतीय बनावटीची आहेत. तमिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणात वाहन उद्योग आहे.
आता तमिळनाडू एक मोठे रणगाडा उत्पादनकेंद्र देखील होऊ शकेल. भारतीय बनावटीच्या या रणगाड्यांचा वापर आपली उत्तर सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी केला जाणार आहे. यातून भारताच्या एकतेचे दर्शन घडते. यावेळी बोलताना मोदींना देशाना सुरक्षेबाबत आत्मनिर्भर करणार असल्याचे देखील सांगितले. त्याबरोबरच कोणत्याही परिस्थितीत देशाचे सार्वभौमत्व टिकवणार असल्याची ग्वाही देखील दिली. सैन्याला जगातील सर्वात आधुनिक सैन्य करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.