कोलंबिया विद्यापीठातील पदवीधर विद्यार्थ्याला पॅलेस्टिनी समर्थक निदर्शनांमध्ये सहभागी झाल्याबद्दल हद्दपार करण्यात आले आहे. अमेरिकेतील लुईझियानाच्या एका इमिग्रेशन न्यायाधीशांनी असा निर्णय दिला आहे. कोलंबिया विद्यापीठातील पदवीधर विद्यार्थी महमूद खलील याला अमेरिकेतून हद्दपार केले जाऊ शकते कारण विद्यापीठ कॅम्पसमध्ये पॅलेस्टिनी समर्थक निदर्शनांमध्ये त्याचा सहभाग हा राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करत होता.
इमिग्रेशन न्यायाधीश जेमी ई. कॉमन्स म्हणाले की, अमेरिकन सरकारने स्पष्ट आणि खात्रीशीर पुरावे दिले आहेत की खलील याच्या देशातील उपस्थितीमुळे परराष्ट्र धोरणावर गंभीर परिणाम होऊ शकतात. यामुळेच त्याला हद्दपार करण्याच्या निर्णयापर्यंत हे पुरावे घेऊन जात आहेत. ८ मार्च रोजी खलीलला त्याच्या विद्यापीठाच्या मालकीच्या अपार्टमेंटच्या लॉबीमध्ये संघीय इमिग्रेशन एजंट्सनी अटक केल्यानंतर हा निर्णय आला आहे. खलीलच्या कायदेशीर पथकाने न्यायालयाच्या निर्णयावर टीका केली आणि ही कार्यवाही योग्य प्रक्रियेचे उल्लंघन असल्याचे म्हटले. त्यांचे वकील मार्क व्हॅन डेर हौट म्हणाले की, सुनावणी ही योग्य प्रक्रियेचा आधारस्तंभ आहे आणि मतभेद दाबण्यासाठी इमिग्रेशन कायद्याचा वापर केला जात असल्याचे एक उदाहरण आहे.
३० वर्षीय खलील, जो कायदेशीररित्या अमेरिकेत राहतो, त्याला त्याच्या कायदेशीर टीम आणि पत्नीपासून दूर, लुईझियानातील जेना येथील इमिग्रेशन डिटेन्शन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. महमूद खलील याची अटक ही राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलविरोधी निदर्शनांमध्ये सामील झालेल्या आणि गाझामधील युद्धाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या पॅलेस्टिनी कार्यकर्त्यांवर आणि विद्यार्थ्यांवर केलेल्या व्यापक कारवाईचा एक भाग होती.
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी खलीलच्या हद्दपारीला पाठिंबा देणाऱ्या कायद्याचा हवाला देत म्हटले आहे की, हा कायदा त्यांना अशा लोकांना काढून टाकण्याचा अधिकार देतो जे अमेरिकेसाठी गंभीर प्रतिकूल परराष्ट्र धोरण परिणामांना कारणीभूत ठरू शकतात. अमेरिकन सरकारच्या या कृतीवरून असे दिसून आले आहे की अशा निदर्शनांमध्ये भाग घेणाऱ्या गैर-नागरिकांना प्रशासनाने यहूदी-विरोधी किंवा हमास समर्थक म्हणून ठरवल्यास त्यांना हद्दपारीला सामोरे जावे लागू शकते.
हे ही वाचा :
जम्मू- काश्मीरमधील किश्तवाडमध्ये दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा
जम्मूच्या अखनूर सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला; एक जवान हुतात्मा
भाजपा-अण्णाद्रमुक आगामी विधानसभा निवडणुकीत एकत्र!
चिदंबरम यांनीच नष्ट केला होता, २६/११ प्रकरणातील एक महत्वाचा दुवा
महमूद खलील हा कोलंबिया यू अपार्टाइड डायव्हेस्ट (CUAD) च्या नेत्यांपैकी एक आहे. हा गट गाझामध्ये हमासविरुद्ध इस्रायली लष्करी कारवाईला विरोध करतो. या गटाने बांगलादेशातील अतिरेकी विद्यार्थी चळवळीलाही पाठिंबा दिला.