भारत आणि कॅनडा या दोन देशांमधील तणावाचा परिणाम आता देशांमधील कंपन्यांवर होऊ लागला आहे. या तणावाच्या पार्श्वभूमीवर आधी दोन्ही देशांच्या परराष्ट्र अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले. त्यानंतर दोन्ही देशांनी आपापल्या नागरिकांसाठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. तर भारताने कॅनडाला दणका देत कॅनडाच्या नागरिकांसाठी व्हिसा सेवा अनिश्चित काळासाठी स्थगित केली आहे.
कॅनडाच्या पंतप्रधानांनी खलिस्तान समर्थक हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचा आरोप भारतावर केल्याने दोन्ही देशांमधील तणाव वाढला. त्याचा परिणाम आता व्यवसायावरही दिसून येत आहे. महिंद्रा अँड महिंद्राने एक मोठी घोषणा केली आहे. कंपनीने गुरुवार, २१ सप्टेंबर रोजी सांगितले की, त्यांची कॅनडा आधारित उपकंपनी रेसन एरोस्पेस कॉर्पोरेशनने काम थांबवले आहे.
महिंद्रा अँड महिंद्राने (M&M) शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, “रेसनला कॉर्पोरेशन कॅनडाकडून २० सप्टेंबर २०२३ रोजी ऑपरेशन्स बंद करण्याच्या मंजुरीसाठी आवश्यक कागदपत्रे मिळाली आहेत, ज्याची माहिती कंपनीला देण्यात आली आहे.” यानंतर रेसनने आपले काम बंद केले. त्यानंतर महिंद्रा अँड महिंद्राचे शेअर्स गुरुवारी ३ टक्के पेक्षा जास्त घसरले आणि १ हजार ५८४.८५ रुपयांवर पोहोचले आहेत.
भारत आणि कॅनडा दरम्यान अनेक व्यवसायिक करार आहेत. अनेक भारतीय कंपन्या कॅनडामधून काम करतात. दोन्ही देशांमधील वादामुळे या कंपन्यांच्या माध्यमातून एकमेकांच्या देशात केलेल्या गुंतवणुकीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यवहाराच्या बाबतीत कॅनडा नवव्या स्थानावर आहे. दोन्ही देशांमध्ये शैक्षणिक, औद्यागिक अशा अनेक क्षेत्रांमध्ये कोट्यवधींचे करार आहेत. भारतीय कंपन्यांबरोबरच कॅनडाच्या अर्थव्यवस्थेलाही मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. कॅनडामध्ये कार्यरत असलेल्या भारतीय कंपन्यांची संख्या हजारोंमध्ये असून अनेक कॅनडीयन लोक या कंपन्यांमध्ये काम करतात. कॅनडामध्ये सुमारे ३० भारतीय कंपन्या असून त्यांची कोट्यवधींची उलाढाल आहे. या मोठ्या कंपन्यांनी कॅनडामध्ये ४० हजार ४४६ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्यामुळे याचा फटका कॅनडाला बसू शकतो.
हे ही वाचा:
हे आहेत कॅनडाशी संबंधित दहशतवादी !
अहमदनगरमध्ये तिहेरी हत्याकांड; जावयाकडून पत्नी, मेव्हणा, आजे सासूची हत्या
मुस्लिम महिलांना आरक्षणात स्थान नसल्यामुळे विधेयकाला ओवैसींचा विरोध !
लष्करी अधिकारी-जवनांमध्ये फूट पाडू नका!
खलिस्तानी दहशतवाद्यांबाबत कॅनडा सरकारच्या वक्तव्यांमुळे भारत आणि कॅनडा देशांमधील संबंध बिघडले आहेत. जूनमध्ये हरदीप सिंग निज्जर याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. जुलै २०२० मध्ये भारताने त्याला ‘दहशतवादी’ घोषित केले होते.