महेश मांजरेकरांचा ‘गोडसे’ चित्रपट येतोय! गांधीजयंतीलाच केली घोषणा…

महेश मांजरेकरांचा ‘गोडसे’ चित्रपट येतोय! गांधीजयंतीलाच केली घोषणा…

आपल्या एकापेक्षा एक सरस चित्रपटांमुळे चित्रपट सृष्टीत स्वतःची एक ओळख तयार करणाऱ्या महेश मांजरेकरांनी महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी गोडसे या सिनेमाचा टीझर लाँच केल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

जनमदिन की हार्दिक शुभकामनाए ‘बापू’ : आपका नाथुराम गोडसे असे शब्द स्क्रीनवर दिसतात. त्याखाली इंग्रजीत गोडसे हे चित्रपटाचे नाव झळकते. महेश मांजरेकर यांनी गांधी जयंतीच्या दिवशीच हे टीझर प्रसिद्ध केल्यामुळे त्यावर टीकाही होऊ लागली आहे.

साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी ही मानवी मनाची काळी विकृत बाजू असल्याची टीका केली आहे.

महेश मांजरेकर यांनी ट्विट करत या चित्रपटाच्या आगमनाची घोषणा केली आहे. आपल्या ट्विटमध्ये मांजरेकर म्हणतात की, आतापर्यंतची सर्वात भयंकर अशा वाढदिवसाच्या शुभेच्छा! आतापर्यंत कुणीही सांगण्याची हिंमत दाखविलेली नाही, अशी कहाणी ऐकण्यास सज्ज व्हा! संदीप सिंग, राज शांडिल्य, महेश मांजरेकर यांची ‘गोडसे’ ही फिल्म महात्मा गांधी यांच्या १५२व्या जयंतीदिनी घोषित होत आहे. नथुराम गोडसेची कहाणी नेहमीच माझ्या हृदयाच्या समीप आहे.

हे सांगतानाच महेश मांजरेकर असेही लिहितात की, ही कहाणी सांगताना आम्ही कुणाही विरोधात बोलू इच्छित नाही. प्रेक्षकांवर आम्ही ती बाब सोडतो. कोण चूक आणि कोण बरोबर हे प्रेक्षकांनी ठरवायचे आहे.

हे ही वाचा:

इराण-अझरबैजान युद्धाची ठिणगी पडली?

…आणि त्याने थेट कुकरशी लग्न केले

फुटबॉलपटू मेस्सीच्या खोलीत शिरले चोरटे आणि…

युरोपातील गदारोळामागे पर्यावरणवादाचा अतिरेक

ते म्हणतात की, अशाप्रकारची फिल्म बनविण्यासाठी प्रचंड धैर्य लागते. मला नेहमीच धक्कादायक विषय आवडतात आणि मी त्याबाबत कोणतीही तडजोड करत नाही. ही कहाणी माझ्या या विचारांच्या चौकटीत भक्कमपणे बसणारी आहे. गांधी यांच्यावर गोळ्या झाडणारी व्यक्ती या पलीकडे गोडसे यांना कुणीही ओळखत नाही.

Exit mobile version