भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार ‘महेंद्र सिंह धोनीने’ सिनेसृष्टीत पदार्पण करत निर्माता म्हणून पाऊल ठेवलं आहे. सिनेमाच्या मैदानात टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने आपल्या नव्या सिनेमाची आज घोषणा केली आहे.
‘धोनी एन्टरटेनमेंट प्रायवेट लिमिटेड’च्या बॅनरखाली आपल्या पहिल्या-वहिल्या सिनेमाची आज घोषणा केली असून ‘एलजीएम : लेट्स गेट मॅरिड’ असं या सिनेमाचं नाव आहे. हा दाक्षिणात्य तामिळ सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘धोनी एन्टरटेनमेंट’ने सोशल मीडियावर या सिनेमाचे मोशन पोस्टर सुद्धा शेअर केले आहे. मोशन पोस्टर शेअर करत त्यांनी लिहिलं आहे,”धोनी एन्टरटेनमेंट या निर्मितीसंस्थेअंतर्गत पहिली कलाकृती सादर करण्यास आम्ही खूप उत्सुक आहोत”.
We're super excited to share, Dhoni Entertainment's first production titled #LGM – #LetsGetMarried!
Title look motion poster out now! @msdhoni @SaakshiSRawat @iamharishkalyan @i__ivana_ @HasijaVikas @Ramesharchi @o_viswajith @PradeepERagav pic.twitter.com/uG43T0dIfl
— Dhoni Entertainment Pvt Ltd (@DhoniLtd) January 27, 2023
‘एलएसजी : लेट्स गेट मॅरिड’मध्ये कोणते कलाकार झळकणार?
हरीश कल्याण, इवाना, नादिया आणि योगी बाबू हे कलाकार ‘एलएसजी : लेट्स गेट मॅरिड’ या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. रमेश थमिलमणी या सिनेमाच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणार असून या सिनेमातील गाणीदेखील त्यांनीच संगीतबद्ध केली आहेत.
‘एलएसजी : लेट्स गेट मॅरिड’ या सिनेमात इवाना मुख्य भूमिकेत आहे. ‘लव्ह टुडे’ या सिनेमाच्या माध्यमातून इवानाला लोकप्रियता मिळाली होती. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला होता. या सिनेमाचे मोशन पोस्टर ऍनिमेशन स्वरुपात बनवण्यात आले आहे. महेंद्र सिंह धोनी आपल्या पहिल्या सिनेमाची अत्यंत कमी बजेटमध्ये निर्मिती करणार आहे. असं कळलं आहे.
हे ही वाचा:
दिल्लीतील कर्तव्यपथावरील संचलनात ‘नारीशक्ती’चं अद्भुत दर्शन
१०६ जणांना पद्म पुरस्कार.. जाणून घ्या कोण मानकरी
लव्ह जिहादचे नेमके चित्रण करणाऱ्या ‘आवरण’ कादंबरीचे लेखक भैरप्पांना पद्मभूषण
पंतप्रधान मोदींनी वाहिली हुतात्म्यांना आदरांजली
‘धोनी एन्टरटेनमेंट’बद्दल जाणून घ्या
महेंद्र सिंह धोनीने धोनी एन्टरटेनमेंट या निर्मिती संस्थेची सुरुवात २५ जानेवारी २०१९ रोजी केली आहे. आतापर्यंत या संस्थेअंतर्गत तीन शॉट फिल्मची निर्मिती करण्यात आली आहे. यात ‘रोर ऑफ द लॉइन’, ‘बिलेज टु ग्लोरी’ आणि ‘द हिडन हिंदू’ सारख्या शॉर्ट फिल्मचा समावेश आहे. आता नव्या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट बघत आहेत. महेंद्र सिंह धोनीने क्रिकेटविश्वात आपल्या कामाने सर्वांना थक्क केलं आहेच. आता सिनेसृष्टीतल्या पिचवर तो कशा प्रकारे खेळतो याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. ऑक्टोबर २०२२ मध्ये धोनी एंटरटेनमेंटने घोषणा केली की ते चित्रपट बनवण्यास सुरुवात करणार आहेत , त्या महत्त्वपूर्ण घोषणेनंतर तीन महिन्यांच , चित्रपटाला आताच ट्रेक्शन मिळू लागला आहे.