न्यूयॉर्कमधील एका मंदिरासमोरील महात्मा गांधींचा पुतळ्याची पुन्हा ताेडफाेड करण्यात आली आहे. या महिन्यात स्मारकावर झालेला हा दुसरा हल्ला आहे. त्यानंतर स्थानिक स्वयंसेवक गटाने या प्रकरणी कारवाई सुरू केली आहे. ही घटना अमेरिकेत मंगळवारी सकाळी घडली हाेती. पोलिसांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, श्री तुलसी मंदिरातील मूर्तीची सहा जणांनी हातोड्याने नासधूस केली आणि त्याभोवती आणि रस्त्यावर द्वेषयुक्त शब्द लिहिले.
या अगाेदर ३ ऑगस्ट रोजी पुतळा पहिल्यांदा तोडण्यात आला आणि तोडफोड करण्यात आली. पोलिसांनी २५-३० वयोगटातील पुरुषांचा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. त्यांचा या हल्ल्यात सहभाग असल्याचा पाेलिसांना संशय आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी पांढऱ्या रंगाची मर्सिडीज बेंझ आणि एका गडद रंगाची कार वापरली हाेती.
न्यूयॉर्क राज्य विधानसभेत निवडून आलेल्या पहिल्या हिंदू विधानसभेच्या सदस्य जेनिफर राजकुमार यांनी गुरुवारी सीबीएस न्यूयॉर्क टीव्हीला सांगितले की, “जेव्हा गांधींच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली, तेव्हा ते खरोखरच आमच्या सर्व श्रद्धांच्या विरोधात होते आणि ते समाजासाठी चांगले नव्हते. हे मंदिर दक्षिण रिचमंड पार्कमध्ये आहे, जेथे भारतीय वंशाचे बरेच लोक राहतात.
हे ही वाचा:
कंबोज यांच्यानंतर आता निंबाळकरांचा ईडीस्फोट
दहीहंडी, गणेशोत्सवादरम्यान दाखल झालेले गुन्हे घेणार मागे
ती बोट इंजिन बंद पडल्याने भरकटली आणि हरिहरेश्वरला आली
भरपावसाळ्यात गटारावरील झाकणे चोरणाऱ्याला अटक
ताेडफाेड दु:खदायक
मंदिराचे संस्थापक पंडित महाराज यांनी न्यूयॉर्क पोस्टला सांगितले की, गांधी शांततेचे प्रतिनिधित्व करतात आणि कोणीतरी येऊन पुतळ्याची तोडफोड केली, हे खूप दुःखदायक आहे.
गेल्या वर्षीही झालेली ताेडफाेड
दुसर्या एका घटनेत, गेल्या वर्षी जानेवारीत कॅलिफोर्नियातील डेव्हिस येथे गांधींचा पुतळा ताेडण्यात आला हाेता. त्याच वेळी, जून २०२० मध्येही घोषणाबाजी करत याच पुतळ्याची तोडफोड करण्यात आली होती.