25 C
Mumbai
Friday, January 17, 2025
घरदेश दुनियाप्रदूषणात महाराष्ट्राचा क्रमांक पहिला का आहे?

प्रदूषणात महाराष्ट्राचा क्रमांक पहिला का आहे?

Google News Follow

Related

संपूर्ण देशाला प्रदूषणाचा विळखा बसला आहे. केंद्र सरकारने प्रदूषणाची सीमा ओलांडलेल्या देशातील १२४ शहरांची नावे संसदेत जाहीर केली. हवेतील शुद्धता कायम टिकवण्यासाठी पर्यावरण विभागाकडून काही मापदंड ठरवून दिले आहेत. या मापदंडांकडे दुर्लक्ष करून प्रदूषणाची पातळी वाढलेल्या शहरांच्या यादीत दिल्लीचा प्रथम क्रमांक लागतो. देशाच्या राजधानीचे शहर हे सर्वात जास्त प्रदूषित आहे. महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर आणि पुणे या शहरांचा क्रमांक प्रदूषित शहरांच्या यादीत अग्रस्थानी आहे.

दिल्लीतील हवेतील प्रदूषणाचे प्रमाण सरासरी १८१ इतके आहे. नोव्हेंबर ते मार्चपर्यंत दिल्लीतील प्रदूषणाची पातळी ५०० ते १००० इतकी असते. हरियाणा आणि पंजाब येथील तण जाळल्याचे परिणाम दिल्लीला भोगावे लागतात. केंद्र सरकार, दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेश राज्य या समस्येवर अद्याप तोडगा काढू शकले नाहीत. भोपाळमधील हवेतील प्रदूषणाचा स्तर १७२, अमृतसरमध्ये १६६, जालंधरमधील स्तर १६५ आणि लुधियानामधील प्रदूषणाचा स्तर १६१ इतका आहे.

सर्वाधिक प्रदूषित शहरे असणाऱ्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्राचा पहिला क्रमांक येतो. महाराष्ट्रातील १८ शहरांत अधिक प्रदूषण आहे. महाराष्ट्रातील चंद्रपूर, पुणे, अकोला, अमरावती, औरंगाबाद, बदलापूर, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नवी मुंबई, नाशिक, नागपूर, सांगली, सोलापूर, ठाणे आणि उल्हासनगर या शहरांचा समावेश आहे.

हे ही वाचा:

‘शेरशाह’ कॅप्टन विक्रम बात्राच्या कुटुंबियांना दिला हा सन्मान

राखी निर्बंधांच्या बंधनात; आता ऑनलाइनचा मार्ग

मीराबाईचे अभिनंदन करून सलमान खान ट्रोल

आता पर्यटनासाठी आरटीपीसीआर चाचणी सक्तीची नाही?

महाराष्ट्राच्या पाठोपाठ उत्तर प्रदेशमध्ये १६ शहरे प्रदूषित आहेत. पश्चिम बंगालमध्ये ७, उत्तराखंडमध्ये ३, मध्य प्रदेशमध्ये ६, पंजाबमध्ये ९, गुजरातमधील ३ आणि आंध्र प्रदेशमधील १३ शहरांचा समावेश आहे. हवेची गुणवत्ता विविध घटकांवर आधारित असते. त्या घटकांचा एकत्रित अभ्यास करून ठराविक शहराचा प्रदूषणाचा स्तर ठरवणे अवघड आहे. त्यामुळे हवेतील शुद्धता टिकवण्यासाठी काही मापदंड ठरवण्यात आले आहेत, असे केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी सांगितले.

सार्वजनिक वाहतुकीवर अधिक भर देण्यासठी मेट्रोच्या उभारणीवर भर दिला जात आहे. स्वयंपाकासाठी सिलेंडरचा वापर अधिक करण्यावर भर दिला जात आहे अशी माहिती दिली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
222,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा