४० वी कुमार-मुली राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा
भुवनेश्वर येथील बिजू पटनाईक इनडोअर स्टेडियमवर सुरू असलेल्या ४०व्या कुमार- मुली राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धेत रविवारी सकाळच्या सत्रात महाराष्ट्रच्या मुलांनी ३६ व्यांदा अंतिम फेरीत प्रवेश करत पुन्हा एकदा विजेतेपदाचे प्रबळ दावेदार असल्याचे दाखवून दिले. यापूर्वी कुमारांनी ३१ विजेतेपद मिळवली आहेत. उपांत्य फेरीत त्यांनी ओरिसाचा १५-१४ असा धुव्वा उडवला. मुलींनी ३६ (मुलीच्या स्पर्धा चार वर्ष उशिरा सुरू झाल्या) पैकी ३२व्यांदा अंतिम फेरीत पोहचल्या असून त्यांनी २२ अजिंक्यपद मिळवली आहेत. आज उपांत्य फेरीत त्यांनी यजमान ओरिसावर अलाहिदा डावात १६-१६ अबरोबरी नंतर ८ सेकंदाच्या फरकाने उपांत्य फेरीत पराभव केला. त्यामुळे अंतिम फेरीत मुलांमध्ये महाराष्ट्राची गाठ दिल्लीशी तर मुलींमध्ये महाराष्ट्र आणि कोल्हापूर अशी झुंज होईल.
कुमारांच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात महाराष्ट्राने यजमान ओरिसा संघावर तब्बल साडेचार मिनिटे राखून १५-१४ (मध्यंतर – ११-०५) असा एका गुणाने धुव्वा उडवला. या सामन्यात महाराष्ट्राच्या आदित्य कुदळे (२:३०, १:०० मिनिटे संरक्षण व एक गडी), सिराज भावे (२:२०, १:३० मिनिटे संरक्षण), किरण वासावे (१:४०, २:०० मिनिटे संरक्षण व दोन गडी), सौरभ अहिर (१:२०, १:०० मिनिटे संरक्षण) यांनी उत्कृष्ट खेळी करताना यजमानांना पराभवाची धूळ चारली. तर ओरिसाच्या स्वयम पारिजा (२:०० मिनिटे संरक्षण व एक गडी), बुद्धिया माझी (१:४०, १:४० मिनिटे संरक्षण व पाच गडी) व लितू मुंडा (चार गडी) यांनी जोरदार लढत दिली.
मुलांच्या दुसर्या उपांत्य फेरीच्या सामन्यात दिल्लीने पश्चिम बंगालचा १२-११ (मध्यंतर –७-६) असा एका गुणाने निसटता पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
मुलींच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात महाराष्ट्राने यजमान ओरिसावर जादा डावात १६-१६ (६-६, ५-५ व ५-५ ) अशी बरोबरी झाल्यावर अलाहिदा डावात (Sudden death) व चुरशीच्या सामन्यात आठ सेकंदाच्या फरकाने विजयश्री खेचून आणली. या सामन्यात महाराष्ट्राच्या अश्विनी शिंदे (२:००, ३;००, १:४० मिनिटे संरक्षण), अंकिता लोहार (२:१०, २:३०, १:३० मिनिटे संरक्षण व एक बळी), संपदा मोरे (१:२०, २:०० मिनिटे संरक्षण व चार बळी), कौशल्या पवार (२:२०, १:३० मिनिटे संरक्षण व तीन बळी) यांच्या झुंजार खेळीमुळे महाराष्ट्र विजयी होऊ शकला तर यजमान ओरिसाच्या मागाई माझी (२:१०, २:१०, २:४० मिनिटे संरक्षण), रंजिता बारीक (२:२० मिनिटे संरक्षण व चार बळी), अर्चना माझी (१:०० ३:००, २:१० मिनिटे संरक्षण व एक बळी) यांनी विजयासाठी जोरदार प्रयत्न केले मात्र त्यांना पराभवचे तोंड पहावे लागले.
हे ही वाचा:
पुरात सर्वस्व वाहून गेले आता कागदपत्रं आणायची तरी कुठून?
सावळजच्या बाळू लोखंडेंची खुर्ची कशी पोहोचली इंग्लंडला?
खासगी क्लासचे दरवाजे उघडू द्या!
हिम्मत असेल तर यावेळी माझा कोल्हापूर दौरा अडवून दाखवा, सोमैय्यांचे आव्हान
मुलींच्या दुसर्या उपांत्य फेरीच्या सामन्यात कोल्हापूरने कर्नाटकचा ९-८ (मध्यंतर ९-४) असा एक डाव व एका गुणाने पराभव केला. वैष्णवी पोवार (३:१०, १:२० मिनिटे संरक्षण व एक बळी), स्नेहा होणमुटे (२:१०, २:०० मिनिटे संरक्षण), श्रुति शिंदे (१:४०, २:२० मिनिटे संरक्षण) व हर्षदा पाटील (१:४० मिनिटे संरक्षण व ३ बळी) यांनी सहज विजय मिळवताना जोरदार कामगिरी केली तर कर्नाटकच्या एस. महेश्वरी (२:०० मिनिटे संरक्षण), के. एम. निसर्गा (१:३० मिनिटे संरक्षण) व ए. ऐश्वर्या (१:२० मिनिटे संरक्षण व २ बळी) यांनी जोरदार लढत दिली मात्र त्या संघाला परभवापासून वाचवू शकल्या नाहीत.