महाराष्ट्राचा मृत्यूदर आता जागतिक पातळीवरही सर्वाधिक

महाराष्ट्राचा मृत्यूदर आता जागतिक पातळीवरही सर्वाधिक

त्यानंतर भारतासह अनेक देशांनी ब्रिटनमधून येणारी विमाने बंद केली. या पार्श्वभूमीवर भारताने मिळवलेले हे यश खूप मोठे.

कोरोनाने एव्हाना राज्याचे आर्थिक कंबरडे मोडून टाकलेले आहे. असे असतानाच, आता सध्याच्या घडीला राज्यातील कोरोना संसर्ग नियंत्रणात आहे असे दिसून येत आहे. असे असले तरी, सत्य म्हणजे राज्यातील मृत्यू दर ही चिंतेची बाब आहे. मुख्य बाब म्हणजे हा मृत्यूदर जागतिक स्तरावर चढा असल्याचे आता स्पष्ट झालेले आहे. त्यामुळे आता या बातमीने चिंतेत अधिकाधिक भर पडलेली आहे.

मध्यंतरी राज्यातील सहा जिल्हे हे चिंताग्रस्त श्रेणीमध्ये होते. आता तर राज्यातील मृत्यूदराची संख्या हाच विषय आता अधिक चिंतेचा झालेला आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार जागतिक मृत्युदर २.१० टक्के आहे. तर राज्यातील मृत्युदर त्यापेक्षा अधिक म्हणजे २.११ टक्के इतका आहे. त्यामुळेच राज्यातील मृत्यूदर हा अधिक आहे हे आकडेवारीतून सुस्पष्ट झाले आहे. म्हणजेच देशातील मृत्युदर राज्यापेक्षा सर्वाधिक कमी १.३४ टक्के इतका आहे.

राज्यामध्ये सध्याच्या घडीला पुणे,कोल्हापूर व औरंगाबाद या दोन मंडळांमध्ये मृत्यूंची नोंद सर्वाधिक होत आहे. शनिवारी पुण्यात ७६ तर कोल्हापूरमध्ये २६ मृत्यूंची नोंद झालेली आहे. मागील आठवड्याभरात पुणे ३४८ व कोल्हापूर २१९ रुग्ण दगावले होते. त्यामुळेच एकूण चित्र पाहता, सध्याच्या घडीला राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या अधिक आहे.

हे ही वाचा:

पद्मश्री सोनम वांग्याल यांना शिखर सावरकर जीवनगौरव

ऑलिम्पिकनंतर भारताचे लक्ष आता पॅरालिम्पिक पदकांकडे

महेश मांजरेकरांना कर्करोगाचे निदान

सोशल मीडियावर सापांशी ‘मैत्री’ नको!

आत्ताच्या घडीला सर्वाधिक सक्रिय रुग्ण पुण्यात आहेत. पुण्यात जवळपास १२ हजार ५०२ सक्रीय रुग्ण आहेत. त्यानंतर ठाणे ७ हजार ०५३, सातारा ६ हजार ५७७, अहमदनगर ५ हजार ३४४, सांगली ४ हजार ८०५, सोलापूर ४ हजार ३५२ आहेत. त्यामुळेच राज्यातील या सक्रीय रुग्णांची संख्या कमी झाली तरच, मृत्यूदर कमी होईल हे आता स्पष्ट झाले आहे.

Exit mobile version