१० राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण

१० राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण

रुग्णसंख्या सर्वाधिक; शिल्लक बेड्सची वानवा

देशभरात वाढलेल्या करोनासंसर्गामुळे देशातील १० राज्यांची अवस्था वाईट असून त्यात महाराष्ट्राची स्थिती अधिक बिकट आहे. जवळपास ६ लाख ८३ हजार ८५६ इतके अॅक्टिव्ह रुग्ण महाराष्ट्रात असून ही संख्या बाकी ९ राज्यांच्या तुलनेत पाच पटीने जास्त आहे. रोज नव्याने भर पडणाऱ्या रुग्णांच्या संख्येच्या बाबतीतही महाराष्ट्र आघाडीवर आहे. किंबहुना, इतर ९ राज्यांच्या तुलनेत रुग्णांची संख्या महाराष्ट्रात दुप्पट किंवा तिप्पट आहे. रुग्णांसाठी शिल्लक बेड्सच्या बाबतही महाराष्ट्र मागे आहे. ३८४० बेड्स महाराष्ट्रात २० एप्रिलपर्यंत उपलब्ध होते. अर्थातच, बेड्सची कमतरता आहे. रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनची महाराष्ट्राला गरज आहे.

हेही वाचा:

ब्रेट लीकडून भारताला ४० लाखांची मदत

फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे काय दिला इशारा?

कमिन्सच्या दातृत्वाने मोदी विरोधकांना पोटशूळ

लसीकरणाचा गुंता सुटणार कधी?

महाराष्ट्राखालोखाल अॅक्टिव्ह रुग्ण उत्तर प्रदेशात आहेत पण दररोज भर पडणारी रुग्णसंख्या महाराष्ट्रापेक्षा जवळपास अर्धी आहे. अर्थातच, बेड्सच्या बाबतीत महाराष्ट्रापेक्षा स्थिती थोडी बरी आहे. रुग्णांची संख्या लाखाच्या घरात असलेल्या राज्यांत कर्नाटक (१ लाख ४२ हजार ८४), छत्तीसगड (१ लाख २९ हजार), केरळ (१ लाख १८ हजार ६७०) यांचा समावेश होतो.
या दहा राज्यांत महाराष्ट्राबरोबर, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, गुजरात अशी राज्ये आहेत. या राज्यांत कर्नाटकला रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनची गरज नाही हे विशेष तर केरळला फक्त लसींची गरज आहे.
गुजरात हे या १० राज्यांत सर्वाधिक कमी रुग्णसंख्या असलेले राज्य आहे. शिवाय, अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येपेक्षाही उपलब्ध बेड्सची संख्या जास्त असलेले ते एकमेव राज्य आहे. बेड्स १३ दिवस पुरतील एवढी उपलब्धता आहे.

‘इंडिया टुडे’ने ही राज्यांच्या आरोग्य विभागाकडून मिळविलेली ही माहिती आहे.

या राज्यांची स्थिती अशी

अॅक्टिव्ह रुग्ण – ६ लाख ८३ हजार ८५६
दररोज वाढणारे रुग्ण – ४८ हजार
बेड्स – ३ लाख ५० हजार
शिल्लक बेड्स – ३८४०
आवश्यकता – रेमडेसिवीर, ऑक्सिजन
बेड्सची कमतरता

अॅक्टिव्ह रुग्ण – २ लाख २३ हजार ५४४
दररोज वाढणारे रुग्ण – २८ हजार
बेड्स – १ लाख ५४ हजार ४२८
शिल्लक बेड्स – १५४००
आवश्यकता – रेमडेसिवीर, ऑक्सिजन
बेड्स जवळपास ३ दिवस पुरतील

अॅक्टिव्ह रुग्ण – १ लाख ४२ हजार ०८४
दररोज वाढणारे रुग्ण – १५ हजार
बेड्स – १३५००
शिल्लक बेड्स – ७०००
बेड्स जवळपास अडीच दिवस पुरतील.

अॅक्टिव्ह रुग्ण – १ लाख २९ हजार
दररोज वाढणारे रुग्ण – १३ हजार
बेड्स – २६ हजार ४२
शिल्लक बेड्स – १०४३२
आवश्यकता – रेमडेसिवीर
बेड्स ४ दिवस पुरतील

अॅक्टिव्ह रुग्ण – १ लाख १८ हजार ६७०
दररोज वाढणारे रुग्ण – १३ हजार
बेड्स – ३५ हजार ८३४
शिल्लक बेड्स – १५ हजार ९६८
आवश्यकता – लस
बेड्स ६ दिवस पुरतील

अॅक्टिव्ह रुग्ण – ८५ हजार ५७१
दररोज वाढणारे रुग्ण – ११ हजार
बेड्स – ७६३८
शिल्लक बेड्स – ८०३६
आवश्यकता – ऑक्सिजन
बेड्स साडेतीन दिवस पुरतील.

अॅक्टिव्ह रुग्ण – ७९ हजार ८०४
दररोज वाढणारे रुग्ण – १० हजार
बेड्स – १ लाख ९१ हजार ३०१
शिल्लक बेड्स – २९३३४
आवश्यकता – ऑक्सिजन
बेड्स १४ दिवस पुरतील

Exit mobile version