फ्रान्समध्ये नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय निवडणुकांमध्ये एमॅन्युएल मॅक्रोन यांनी बाजी मारली आहे. मॅक्रोन पुन्हा एकदा फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष झाले आहेत. मरीन ली पेन यांचा पराभव करत मॅक्रोन यांनी पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्ष पदाच्या खुर्चीवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
निवडणुकांमध्ये मॅक्रोन यांना ५८.५५ टक्के मते पडली आहेत. तर मरीन ली पेन यांना ४१.४५ टक्के मतदान झाले आहे. मॅक्रोन यांचा हा विजय ऐतिहासिक ठरला आहे. कारण गेल्या वीस वर्षात फ्रान्स मध्ये पहिल्यांदा राष्ट्राध्यक्षांची पुनर्निवड जनतेने केली आहे. या निवडणुकीत जवळपास ३३ टक्के लोकांनी दोन उमेदवारांपैकी कोणालाही मतदान केले नाही. तर मतदानाची टक्केवारी ही देखील केवळ ७२ टक्के राहिली होती. १९६९ पासून राष्ट्रपती निवडणुकीतील ही सर्वात कमी टक्केवारी आहे.
हे ही वाचा:
निवृत्त केंद्रीय गृहसचिव डॉ. माधव गोडबोले यांचे निधन
कोल्हापूर न्यायालयात सदावर्तेंचा जामीन मंजूर
‘ठाकरे सरकारचे वर्तन हिटलर पद्धतीने’
सोमय्या यांच्यावरील हल्ल्यानंतर केंद्रीय गृहसचिव आवश्यक पावलं उचलणार
मॅक्रोन यांच्या ऐतिहासिक विजयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत मॅक्रोन यांना शुभेच्छा दिल्या आहेत. “फ्रान्सच्या अध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल माझे मित्र एमॅन्युएल मॅक्रोन यांचे अभिनंदन ! भारत-फ्रान्स धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी यापुढेही एकत्र काम करण्यास मी उत्सुक आहे.”